A fire broke out at a power plant project.
A fire broke out at a power plant project.  esakal
जळगाव

Jalgoan Fire Accident : दीपनगर वीज प्रकल्पाला आग; 3 तासानंतर आगीवर नियंत्रण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : दीपनगर येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ५०० मेगावॉट प्रकल्पात गुरुवारी (ता. १८) सकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली. या आगीत तीन मीटर जळून खाक झाले. (fire broke out in 500 MW project at thermal power plant in Deepnagar jalgaon news)

दुसरीकडे निर्माणाधीन असलेल्या ६६० मेगावॉटच्या नवीन प्रकल्पामध्येही एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याने कॉन्ट्रॅक्टर व कामगारांमध्ये मोठी धावपळ उडाली. अग्निशमक दलाने तब्बल तीन तासानंतर ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, या घटनांमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसून प्रकल्पाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ५०० मेगावॉट प्रकल्पाचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाऊन पाहणी केली. आगीने भीषण रूप धारण केल्यामुळे प्रकल्पात आगीचे तांडव सुरू होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आग विझविण्यासाठी अधिकाऱ्यांची दोन ते तीन तास धावपळ सुरू होती. मात्र ६६० मेगावॉट प्रकल्पामध्ये किती नुकसान झाले, याची माहिती देण्यास येथील अधिकारी टाळाटाळ करत होते.

दरम्यान, अग्निशमक दलाने तीन तासानंतर आग आटोक्यात आणली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तशा सूचना दिल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT