BAMS esakal
जळगाव

Jalgaon News : यंत्रणांच्या उदासीनतेने हायकोर्टाची ‘तारीख पे तारीख’

राज्यातील आयुर्वेद महाविद्यालयांतील ‘बीएएमएस’च्या पाचशेहून अधिक जागा रिक्त असून त्या जागा भरून घेण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल असताना प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणांच्या उदासीनतेमुळे या प्रकरणात ‘तारीख पे तारीख’चा अनुभव येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्यातील आयुर्वेद महाविद्यालयांतील ‘बीएएमएस’च्या पाचशेहून अधिक जागा रिक्त असून त्या जागा भरून घेण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल असताना प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणांच्या उदासीनतेमुळे या प्रकरणात ‘तारीख पे तारीख’चा अनुभव येत आहे. दोन महिन्यांपासून प्रलंबित या याचिकेवर सोमवार (ता.५) नंतर आता पुन्हा बुधवारी (ता.७) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

सोमवारी (ता.५) प्रतिवादींपैकी एका यंत्रणेकडून वकीलच हजर न झाल्याने विद्यार्थी ताटकळतच आहेत. यापूर्वी १५ डिसेंबरची तारीख मिळाली होती. (Five hundred BAMS seats in Ayurveda College are vacant and high courts to system apathy jalgaon news)

मात्र तेव्हा काही कारणास्तव कामकाज होऊ शकले नाही. नंतर न्यायालयास नाताळच्या सुट्या लागल्या. त्यामुळे उच्च न्यायालयाने २ जानेवारी व त्यानंतर पुढची तारीख २२ जानेवारी दिली होती. एकीकडे ‘तारीख पे तारीख’ सुरु असताना प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणांनी सकारात्मक भूमिकाच घेतली नाही.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा मुद्दा उचलून सीईटी सेल-आयुष मंत्रालयास निवेदन दिले. ‘सकाळ’नेही या मुद्याचा पाठपुरावा केला. तरीही यंत्रणा याबाबत उदासीन आहेत. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत ग्रुप ‘बी’मधील बीएएमएस, बीएचएमएस व बीयुएमएस या शाखांच्या प्रवेशासाठी ३० नोव्हेंबर ही ‘कट ऑफ डेट’ दिल्यानंतर प्रवेश प्रक्रिया संपुष्टात आली होती.

मात्र, आयुष मंत्रालयांतर्गत ‘एनसीआयएसएम’ने ३० नोव्हेंबरपर्यंत व त्यानंतरही काही नव्या आयुर्वेद महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी मान्यता दिली. मात्र, प्रवेश प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतर या महाविद्यालयांना त्यात सहभागी होता आले नाही. शिवाय, नोव्हेंबरमध्ये ज्या महाविद्यालयांना मान्यता मिळाली, त्यातील व नव्याने मान्यता मिळालेले सहा अशा विविध महाविद्यालयांमधील सुमारे पाचशेहून अधिक ‘बीएएमएस’च्या जागा सध्या रिक्त आहेत.

‘स्पॉट राउंड न झाल्याने समस्या

एनसीआयएसएम ही केंद्रीय यंत्रणा व महाराष्ट्रात सीईटी- सेल प्रवेश प्रक्रिया राबविते. दरवर्षी या प्रक्रियेत कॅप राउंड, नंतर स्ट्रे व्हॅकन्सी राउंड होऊन शेवटी महाविद्यालयीन स्तरावरचा ‘स्पॉट राउंड होतो, त्यातून रिक्त जागा भरल्या जातात. या वेळी मात्र यंत्रणांनी स्पॉट राउंडच घेतला नाही. त्यामुळे महाविद्यालयांमधील बऱ्याच जागा रिक्त राहिल्या.

मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहणे महाविद्यालयांना परवडणारे नाही. राज्यात प्रवेश प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतर सहा महाविद्यालयांना मान्यता मिळाली, त्यांच्या तर सर्वच जागा रिक्त आहेत. त्यामुळे महाविद्यालयांनी वैयक्तिक व असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ आयुर्वेद कॉलेजकडून या जागा भरून घेण्यासाठी दोन वेगवेगळ्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

विद्यार्थ्यांकडून आत्महत्येच्या कमेंटस्‌

एक तर ही प्रवेश प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत चालली. तोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही, ते प्रतीक्षेत राहिले. नंतर एखादा स्पॉट राउंड होईल, महाविद्यालये नवीन असल्याने त्यांना मुदतवाढ मिळेल, कोर्टाचा निर्णय येईल, अशा आशेत विद्यार्थ्यांनी वाट पाहिली.

विशेष म्हणजे, यातील तज्ज्ञ समुपदेशकही राउंड नक्की होईल, असे सांगत होते. त्यातही आता दोन महिने गेल्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘नीट’ची परीक्षा पुन्हा देण्याच्या दृष्टीने अभ्यासही केला नाही.

आता ‘नीट’ परीक्षा तीन महिन्यांवर आली असताना विद्यार्थी अभ्यास कसा करणार? त्यामुळे या प्रक्रियेने निराश झालेले विद्यार्थी समुपदेशकांच्या यासंबंधीच्या व्हीडीओवर कमेंटस्‌ करताना आत्महत्येची भाषा करू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT