Medicine
Medicine Sakal
जळगाव

रुग्णालयातील मेडीकलमधूनच औषधे घेतले पाहीजे का? औषधी सक्तीच्या अध्यादेशाची जनजागृती नाहीच!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मल्टिस्पेशालिटीच्या नावाखाली हॉस्पिटलमध्येच औषध दुकाने थाटून तेथूनच औषधी खरेदीची सक्ती नियमबाह्य आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषध खरेदी करू शकतात, असा अध्यादेश अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीएचे) आयुक्त अभिमन्यू काळे यांनी बजावला आहे. असे असतानाही अद्याप या आदेशाची माहितीच जळगाव जिल्ह्यातील बहुतांश हॉस्पिटल आणि दुकानदारांना नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावाखाली आता प्रत्येक हॉस्पिटलमध्ये संलग्न औषध दुकाने थाटली आहेत. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी ठराविक ब्रॅन्डची किवा कंपनीची खरेदी करावी, असा अलिखित नियम वैद्यकीय क्षेत्रात वर्षानुवर्षे सुरू आहे. त्या डॉक्टरांनी लिहिलेली औषधी बाजारात इतर कुठेही मिळतच नाही, असा समज दृढ झाल्याने उपचारापेक्षा औषधांचाच अधिक ताण रुग्ण व त्याच्या नातेवाइकांवर येतो. आपल्याला लुबाडण्यात येत असल्याचे कळूनही निमूटपणे ही झळ सोसावी लागत होती.

...म्हणून काढला अध्यादेश

रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांवर रुग्णालयाशी संलग्न औषध दुकानांतूनच औषध खरेदी करण्यासाठी सक्ती करण्यात येत असल्याच्या तक्रारी सातत्याने ‘एफडीए’कडे येत होत्या. त्याची गंभीर दखल घेत ‘एफडीए’ने अशा सक्तीला लगाम घालण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. राज्य अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्य काळे (भाप्रसे) यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक जारी केले असून, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

दर्शनी भागात फलक हवा!

‘रुग्णालयातील औषध दुकानातून रुग्णांनी औषध खरेदी करावी, अशी सक्ती नाही. रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधांची खरेदी करू शकतात’, अशा आशयाचा फलक ठळकपणे संबंधित रुग्णालयांनी रुग्णांना दिसेल, अशा दर्शनी भागात लावावा. याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात, असेही पत्रकात नमूद केले आहे.

अवाजवी दराने औषधविक्री

रुग्णालयाशी संलग्न औषध दुकानात मनाला पटेल त्या चढ्या दराने औषधांची विक्री केली जात असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. तशाच पद्धतीचे आणि तेच परिणामकारक गुणधर्म असलेल्या इतर ब्रॅन्डच्या औषधी इतरत्र स्वस्त औषधे मिळत असतानाही रुग्णालयाच्या सक्तीमुळे रुग्ण वा त्यांच्या नातेवाइकांची होणारी जबरी लूट या आदेशाने तरी थांबते काय, हा मोठा प्रश्न आहे.

जेनेरिक औषधांचा तिटकारा

अशा स्थितीत एखाद्या रुग्णाने जेनेरिक औषधाची मागणी केल्यास किंवा इतरत्र मिळतील, अशी औषधे लिहून देण्याचे सांगितल्यास डॉक्टर परिणामकारकता आणि त्यातील कंटेटवर लेक्चर देत चक्क त्यांच्या विशिष्ट ब्रॅन्डचे फायदे रुग्णांना अवगत करून देऊ लागले आहेत.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

डॉक्टरांचा जोडधंदा

जळगावसह जिल्ह्यात प्रत्येक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल-रुग्णालय इतकंच काय, तर चक्क डिस्पेन्सरीलाही संलग्न औषध दुकाने आहेत. दवाखान्यात छोटासा गाळा काढून फार्मसी झालेल्या एखाद्या तरुणाला त्याच्या परवान्यासह मासिक मानधनावर ‘हायर’ करून डॅाक्टरांनीच दुकाने थाटली आहेत. परिणामी, डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे त्याच दुकानात उपलब्ध असतात. बाजारात ती कोठेच मिळत नाही. डॉक्टरांना त्यांच्या फी ऑपरेशनच्या पैशांपेक्षा जास्त नफा या औषध दुकानातूनच होत असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT