Leopard  Sakal
जळगाव

Jalgaon Leopard News: दोन्ही बछडे अखेर आईच्या कुशीत! वन विभागाच्या प्रयत्नांना यश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Leopard News : उसाच्या शेतात मिळून आलेल्या बिबटच्या दोन्ही बछड्यांची अखेर त्यांच्या आईची भेट घडवून आणण्यात वन विभागाला यश आले. वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्या सुयोग्य नियोजनामुळे दोन्ही बछडे त्यांच्या आईच्या कुशीत स्थिरावले.

आपल्या दोन्ही पिलांना घेऊन बिबट मादीने रात्रीच्या सुमारास जंगलाकडे धूम ठोकली. हा प्रसंग वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात टिपला गेला. आज सकाळी हे चित्रण पाहून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सुखद धक्का मिळाला. (forest department succeeded tiger cubs to finally meet their mother jalgaon news)

बहाळ (ता. चाळीसगाव) शिवारातील खेडगाव रस्त्यालगत गुढे येथील शेतकरी पुंडलिक चौधरी यांच्या शेतात मंगळवारी (ता. ७) ऊस तोड सुरू सकाळी साडेदहाच्या सुमारास कामगारांना बिबट्याचे दोन बछडे आढळले होते. ही माहिती वन विभागाला दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे व कर्मचारी काही वेळातच दाखल झाले.

नर व मादी जातीचे हे बछडे आपल्या आईपासून दुरावले जाऊ नये, यासाठी त्यांना सुरक्षितरित्या त्याच ठिकाणी स्वतः शीतल नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये ठेवण्यात आले. आई व पिलांची भेट होते की नाही, हे पाहण्यासाठी शेतात ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला होता. या पिलांना घेण्यासाठी त्यांची आई आल्याशिवाय राहणार नाही, असा नगराळे यांच्यासह वन कर्मचाऱ्यांना विश्‍वास होता.

त्यानुसार सायंकाळी साडेसातच्या सुमारास अंधार पडल्यानंतर अपेक्षेप्रमाणे बिबट मादी पिलांना शोधत आली. पिलांजवळ येताच कॅरेटवर ठेवलेला पुठ्‍ठा तिने पंजा मारुन खाली पाडला. कॅरेट मोकळे झाल्यानंतर एका पिलाला आपल्या तोंडात उचलून ती घेऊन गेली. काही मिनिटातच ती दुसऱ्या पिलाला अशाच पद्धतीने घेऊन जंगलात निघून गेली. हे सर्व चित्रण कॅमेऱ्यात कैद झाले.

दोन्ही बछड्यांची आपल्या आईची भेट झाल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. ही भेट घडवून आणण्यासाठी शीतल नगराळे यांच्यासह जुवार्डीचे वनपाल सी. व्ही. पाटील, काळू पवार, राहुल पाटील, राहुल मांडोळे, योगेश देशमुख, अजय महिरे, दिनेश कुलकर्णी, मोनिका निकम, वंदना विसपुते, माधुरी जाधव, भटू अहिरे आदी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

Dhule Municipal Election : धुळ्यात मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! दोन महिला उमेदवार बिनविरोध; विरोधकांना मोठा धक्का

Narayangaon Protest : जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक कधी थांबणार; डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू; धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन!

SCROLL FOR NEXT