crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : नोटीसच्या पोचपावतीवर बनावट सह्या; खळबळजनक प्रकार उघडकीस

सकाळ वृत्तसेवा

रावेर (जि. जळगाव) : पालिकेच्या वाढीव हद्दीतील वसाहतींमध्ये पालिकेने दिलेल्या सुनावणीच्या नोटिसांवर वाटप करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींनी ज्यांना नोटीस बजावल्या आहेत, अशा नागरिकांना नोटीस मिळाल्याच्या बोगस सह्या केल्याच्या पोचपावत्या पालिकेत जमा केल्याचा खळबळजनक प्रकार सायंकाळी उघडकीला आला. या प्रकाराबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून दोषी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. (Forged signatures on acknowledgment of notice Jalgaon Crime News)

शहरातील वाढीव वसाहतींमधील ज्या नागरिकांना पालिकेकडून नोटीस मिळालेल्या नव्हत्या, अशांपैकी काहींनी पालिकेत जाऊन विचारणा केली असता अनेकांना सुनावणीची केवळ तारीख सांगून गोडी गुलाबीने रवाना करण्यात आले. मात्र, काही चिकित्सक नागरिकांनी मूळ नोटीस किंवा नोटीस मिळाल्याची प्रत पाहण्याची मागणी केली असता, सहा- सात नागरिकांना त्यांच्या नोटीस मिळाल्याच्या काउंटरवर (पोचपावतीवर) त्यांच्या नावाने बोगस सह्या केल्याचे आढळून आले.

त्यामुळे शेकडो नागरिकांना नोटीसा मिळालेल्या नसतानाही बोगस सह्या करुन या नोटीसा मिळाल्याचे दाखवण्यात आले आहे. याबाबत पालिकेने शहानिशा करून बोगस सह्या करणाऱ्या संबंधित कंपनी आणि कंपनीच्या प्रतिनिधीविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि नोटीसच मिळालेली नसल्याने उद्या (ता. २०) आणि परवा (ता. २१) ला होणारी सुनावणी पुढे ढकलावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

बोगस सर्वेक्षणचा संशय

ज्या कंपनीच्या प्रतिनिधींनी नागरिकांच्या बोगस सह्या केल्या आहेत, त्याच आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीने रावेर शहरातील सर्व वाढीव वसाहतीतींल मालमत्ता धारकांच्या मालमत्तांचे सर्वेक्षण केले आहे, ते देखील असे बोगस केले नसेल कशावरून? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांसह प्रशासकांनी चौकशी करुन संबंधित दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.

दरम्यान, या संदर्भात मुख्याधिकारी स्वालिहा मालेगावे यांना विचारणा केली असता, बोगस सह्या केल्याच्या प्रकाराची शहनिशा केली जाईल, असा प्रकार घडला असेल तर संबंधित कंपनीवर कारवाई करु असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 22 Installment : 2,000 रुपये अडकणार? 30 लाख शेतकऱ्यांना धक्का; पीएम किसान योजनेबाबत कृषीमंत्र्यांची संसदेत मोठी माहिती

National Highway Toll Rules : अपूर्ण राष्ट्रीय महामार्गावर आता ‘टोल’ नाही, सुधारित तरतूद लागू

Latest Marathi News Live Update : महाशिवरात्रीसाठी त्र्यंबकेश्वर मंदिरात जय्यत तयारी, मेहंदी थीम फुलांच्या सजावटीने मंदिर गाभारा उजळला

IND vs PAK : संजू सॅमसन OUT, अभिषेक शर्मा IN ! पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल

गेले २ दिवस 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात दिसत नाहीये आयुष संजीव; समोर आलंय मोठं कारण, काय घडलंय?

SCROLL FOR NEXT