State President of BJP Chandrasekhar Bawankule giving appointment letter to former MLA Smita Wagh as State Vice President of BJP  esakal
जळगाव

Jalgaon Political News : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आमदार स्मिता वाघ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा नुकतीच झाली. यात प्रदेश उपाध्यक्षपदी विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता उदय वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Former MLA Smita Wagh as State Vice President of BJP jalgaon political news)

या कार्यकारिणीत सक्षम आणि क्रियाशील आणि संघटनात्मक कौशल्य अवगत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. या नियुक्तीने अमळनेर मतदारसंघासह जळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरणात निर्माण झाले आहे. विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी परिषद व चळवळीच्या माध्यमातून भाजप परिवाराशी जोडल्या गेलेल्या स्मिता वाघ कालांतराने भाजपकडून निवडणूक लढवून जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या.

तेव्हापासून त्यांचा आलेख वाढतच राहिला. जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत पोहोचल्यानंतर कामाची पावती म्हणून विधान परिषद सदस्यपदाची मोठी संधी त्यांना पक्षाने दिली. सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा नावलौकिक असताना त्यांच्यात संघटन कौशल्य हा मोठा गुण असल्याने पक्ष कायम त्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या देत राहिला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दरम्यानच्या काळात जळगाव जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, प्रदेश महिला अध्यक्ष, मुख्य कार्यकारिणीत प्रदेश चिटणीस नंतर उपाध्यक्ष व आता पुन्हा नव्या कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करून मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.

या नियुक्तीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, एकप्रकारे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळकटी मिळाली आहे. या नियुक्तीबद्दल स्मिता वाघ यांचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT