robbery esakal
जळगाव

Jalgaon Crime News : बंद फ्लॅटचे कुलूप तोडून साडेचार लाख लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील विजय कॉलनीतील प्रसाद आपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचे फोडून चोरट्यांनी ४ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लांबविल्याची (Robbery) घटना गुरुवारी (ता. ६) रात्री उघडकीस आली. (Four and half lakh robbery in Vijay Colony jalgaon crime news)

गणेश नारायण व्यास (वय ४९) विजय कॉलनीतील प्रसाद अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये परिवारासह वास्तव्यास आहेत. शहरातील एका हॉटेलात मॅनेजर म्हणून ते कार्यरत असून, गुरुवारी (ता. ६) सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास ते कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेले होते.

याचाच फायदा घेत चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड, असा एकूण चार लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

घरी परतल्यावर घटना उघडकीस

गणेश व्यास घरी आल्यावर त्यांना दरवाजा उघडा दिसला. घरात जाऊन पाहिल्यावर त्यांना घरातील कपाटातील सोन्याचे दागिने व रोकड आढळून आली नाही. श्री. व्यास यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली.

याबाबत गणेश व्यास यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक शांताराम देशमुख तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT