accident esakal
जळगाव

Jalgaon Accident News : कन्नड घाटात तवेरा गाडी कोसळून चौघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव ः तुळजापूर, अक्कलकोटवरुन देवदर्शन करुन घराकडे पतरणारी भाविकांची तवेरा गाडी (क्रमांक- एम. एच. ४१, व्ही ४८१६) कन्नड घाटात रविवारी (ता. २६) रात्री साडेअकराच्या सुमारास कोसळल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार तर सात जण गंभीररित्या जखमी झाले. ( Four dead in Tavera car crash in Kannad Ghat jalgaon accident news )

मयतांमध्ये दोन महिला व आठ वर्षीय बालिकेचा समावेश आहे. गाडीतील सर्व प्रवासी जाजूवाडी या मालेगाव (जि. नाशिक) शहरापासून चार किलोमीटरवर असलेल्या परिसरातील रहिवासी आहेत.

अपघाताची माहिती समजताच शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मंत्री दादा भुसे यांना या अपघाताची माहिती कळताच त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना संपर्क केला. आमदार चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढून उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात प्रकाश गुलाबराव शिर्के (वय ६५), शीलाबाई प्रकाश शिर्के (६०), वैशाली धर्मेंद्र सूर्यवंशी (३५) व पूर्वा गणेश देशमुख (०८) हे मृत्युमुखी पडले तर अनुज धर्मेंद्र सूर्यवंशी (२०), जयेश धर्मेंद्र सूर्यवंशी (१७), सिद्धेश पुरुषोत्तम पवार (वय १२), कृष्णा वासुदेव शिर्के (४), रूपाली गणेश देशमुख (३०), पुष्पा पुरूषोत्तम पवार (३५) व वाहन चालक अभय पोपटराव जैन (५०) हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघात प्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

SCROLL FOR NEXT