Accident News esakal
जळगाव

Jalgaon Accident News : लग्नासाठी येणाऱ्या बापलेकाला ट्रॅक्टरची धडक; पित्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगावला नातेवाइकांच्या लग्नासाठी दुचाकीने येणाऱ्या बापलेकासह चौघांना ट्रॅक्टरने धडक दिली. ही घटना मंगळवारी (ता. १६) सावखेडा फाट्यावर घडली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर तीन जण जखमी झाले. (Four people were hit by tractor jalgaon accident news)

ज्ञानेश्वर रामराव सपकाळे (वय ४१, रा. फुफनी, ता. जळगाव) असे मृताचे नाव आहे, तर त्यांचा मोठा मुलगा डिगंबर सपकाळे (वय १९), त्यांचे मित्र राजेंद्र सोनवणे (४८), नीलेश निकम (४५) जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ज्ञानेश्वर सपकाळे जळगावातील रिंग रोडवरील मंगल कार्यालयात नातेवाइकाच्या लग्नासाठी दुचाकीने फुफनी येथून येण्यासाठी निघाले. त्यांच्यासोबत दुचाकीवर मोठा मुलगा डिगंबर व दुसऱ्या दुचाकीवर राजेंद्र सोनवणे, नीलेश निकम निघाले होते. काही अंतरावर सावखेडा फाट्यावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकींना एकामागून एक जोरदार धडक दिली.

या अपघातात चौघेही रस्त्याच्या खाली फेकले गेले. यात ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या डोक्याला व हाताला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले, तर इतर तीन जण जखमी झाले. या अपघाताची माहिती गावात पोचली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सावखेडा, किनोद गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबत शांताराम निकम यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहाय्यक फौजदार अनिल फेगडे अधिक तपास करीत आहेत.

मंगल कार्यालय शोकमग्न

विवाह असल्याने ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या पत्नी वंदना सकाळीच लग्नाच्या ठिकाणी पोचल्या होत्या. पती ज्ञानेश्वर व मुलगा डिगंबर यांची त्या वाट पाहत असतानाच अपघाताची वाईट बातमी कानावर पडली. ऐन लग्नाच्या धामधुमीत धावपळ उडून नातेवाइकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. मृत ज्ञानेश्वर सपकाळे यांच्यामागे तीन मुले, पत्नी व आई, असा परिवार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal TMC Politics: पश्चिम बंगालमधील राजकीय भूकंपानंतर भाजपने दिली पहिली प्रतिक्रिया; नवीन गट सत्तेत जाणार का?

Solapur MLC Election : सोलापूर विधान परिषदेत मोठा गेम! काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद; एका सहीमुळे संपूर्ण निवडणूक फिरली? फत्तेपूरकरांनी उच्च न्यायालयात घेतली धाव

Baba Vanga Prediction: शेवटच्या ७ महिन्यात 'हे' लोक होणार मालामाल! बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत; कोणत्या राशींना होणार लाभ?

Karad Bridge Opening : पुणे -कोल्हापूर महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज, कऱ्हाडचा उड्डाणपूल वाहतुकीस खुला होण्याची तारीख ठरली

'या' आद्याक्षराने नाव सुरु होणारे लोक असतात स्वतःच्या मर्जीचे मालक ! अत्यंत हुशार आणि श्रीमंत होणारे लोक

SCROLL FOR NEXT