(Fraud by creating fake Facebook accounts of senior officials Jalgaon Cyber Fraud esakal
जळगाव

Jalgaon Cyber Fraud : वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट बनवून फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Cyber Fraud : तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह आयआरएस अधिकारी अजय खर्डे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे घरगुती साहित्य विक्रीचे सांगून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fraud by creating fake Facebook accounts of senior officials Jalgaon Cyber Fraud )

अमन मित्तल यांची दोन दिवसांपूर्वीच बदली झाली आहे. तर, पूर्वी पोलिस दलात कार्यरत आणि आता आयआरएस अधिकारी असलेले अजय खर्डे या दोघांच्या नावाने एक सारखेच चॅटिंग करून परिचित फेसबुक फ्रेंड्सकडून पैसे उकळण्यात आले आहेत. श्री. मित्तल यांच्या नावाने सायबर गुन्हेगाराने फेसबुकवर बनावट खाते तयार केले.

त्यावर स्वतः अमन मित्तल असल्याचे भासवून बदली झाल्याने घरगुती सामान विक्री करावयाचे असल्याची पोस्ट संबंधिताने फेसबुकवरून टाकली. बनावट फेसबुक तयार करून घरगुती साहित्य विक्री केले जात असल्याच्या या पोस्टबाबत मित्तल यांच्या मित्रांनी त्यांना कळविले. त्यानंतर खात्री झाल्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी मित्तल यांनी ऑनलाइन पद्धतीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.

तसेच, प्रकाराबाबत फोनवरून जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना कळविले. तसेच, संबंधित बनावट फेसबुक खाते व त्यावरून फसवणूक संदर्भातील मॅसेजचे फोटो मित्तल यांनी पोलिस अधीक्षक राजकुमार यांना व्हॉट्‌सॲपवरून पाठविले. सायबर गुन्हेगाराने घरगुती साहित्य विक्री असल्याच्या पोस्टसोबतच त्याचा पेटीएम क्रमांकही टाकला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याच पेटीएम खात्यावर पैसे जमा करण्यासाठी बँक अकाउंट नंबरसह संपूर्ण माहिती आणि पेटीएमचा क्युआर कोड स्कॅन करण्यासाठीही पाठविला होता. या संबंधित माहितीवरून बनावट फेसबुक खाते तयार करणाऱ्याचे नाव गोवर्धनलाल साहू असे असल्याचे समोर आले आहे. घडल्या प्रकाराला पोलिस अधीक्षक राजकुमार यांनी दुजोरा दिला आहे. तसेच, या प्रकारात अद्याप तरी कुणाचीही फसवणूक झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आयआरएस अधिकारी अजय खर्डे यांच्या नावाने फेसबुक खाते तयार करून त्यांच्याशी परिचितांना मॅसेंजरद्वारे चॅटिंग करून सुरवातीला मोबाईल नंबर मागण्यात आला. नंबर मिळाल्यावर माझा सेना दलातील मित्र असून, त्याची बदली झाली आहे.

त्याच्या घरातील फर्निचर कमी किमतीत द्यायचे आहे, असे सांगत समोरची व्यक्ती संपर्क करते. फ्रिज, डायनिंग टेबल, डबलबेड, सोफा अशा उत्तम स्थितीत असलेल्या फर्निचरचे छायाचित्र टाकून संबंधिताला ऑनलाइन पैसे टाकण्यास सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT