Cyber Crime esakal
जळगाव

Jalgaon Cyber Crime: उच्चशिक्षीत महिलेस साडेआठ लाखांचा चुना

कस्टमर केअरच्या नावे लिंक पाठवून खात्यात मारला झाडू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Cyber Crime : महाराष्ट्र बँक कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगत तुमची गेलेली रक्कम परत मिळवून देतो, असे आश्‍वासन देऊन एरंडोल येथील एका उच्चशिक्षित महिलेची ८ लाख ५५ हजार ४१ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

शनिवारी (ता. ५) याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (fraud of eight half lakhs to highly educated woman Jalgaon Cyber ​​Crime)

एरंडोल येथील रहिवासी तथा महाविद्यालयात नोकरीला असलेल्या शर्मिला अनिल चिकाटे (वय ५०) यांना शुक्रवारी (ता. ४) वेगवेगळ्या क्रमांकावरुन संपर्क साधण्यात आला. त्यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र कस्टमर केअरमधून बोलत असून, या बँकेची गेलेली रक्कम तुम्हाला मिळवून देतो असे सांगण्यात आले.

यासाठी त्यांच्या व्हॉटस् अप क्रमांकावर कस्टमर सपोर्ट- ४ एपीके, कम्प्लेंट रजिस्टर एपीके व एनी- डेस्क या ॲप्लिकेशनची लिंक पाठवून ते डाऊनलोड करण्यास सांगितले.

या दरम्यान त्यांनी महिलेचा विश्‍वास संपादन करीत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून महिलेच्या मोबाईलचा एक प्रकारे ताबा घेत कॅनरा बँकेच्या खात्याची संपूर्ण माहिती चोरुन घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याआधारे या खात्यातून ८ लाख ५५ हजार ४१ रुपये ऑनलाईन काढून फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शर्मिला चिकाडे यांनी शनिवारी (ता. ५) जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बी. डी. जगताप करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT