Fraud Case News  esakal
जळगाव

Jalgaon : पाटील कन्स्ट्रक्शनची 45 लाखांत फसवणूक

याप्रकरणी रामानंद पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शेडचे काम दिल्यानंतर ते पूर्ण न करता ४५ लाखांत शासकीय मक्तेदार असलेल्या एल. एच. पाटील कन्स्ट्रक्शनच्या संचालकाची फसवणूक केल्याप्रकरणी रामानंद पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

एल. एच. पाटील कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे संचालक लालसिंग हिलालसिंग पाटील (वय ७०, रा. जयनगर) शासकीय मक्तेदार असून, विविध प्रकारची कामे ते घेत असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नाना उखा बोरसे यांच्या अधिपत्याखाली त्यांची काही कामे चालतात. १० जानेवारी २०१७ ला सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता बसवराज पांढरे यांच्या शासकीय निवासस्थानी कामास असलेले अक्षय ओंकार चोपडे (रा. पुणे) यांनी लालसिंग पाटील यांना बोलावून घेतले. अक्षय चोपडे या मक्तेदाराची ग्रॅव्हीटी ग्रुप नावाने कंपनी आहे. जिल्ह्यातील २५-३० लाख रुपयांपर्यंतची कामे त्यांना द्या, अशी विनंती नाना बोरसे यांनी लालसिंग पाटील यांना केली.

अशी झाली फसवणूक

त्यानुसार लालसिंग पाटील यांनी त्यांच्या मालकीच्या शिरसोली व नागदुली शिवारातील शेताच्या शेडचे बांधकाम करण्याचे काम अक्षय चोपडे यांना दिले. त्यापोटी १३ लाख ७८ हजार रुपयांचा धनादेशही दिला. पैसे दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात केली नाही, म्हणून लालासिंग पाटील यांनी फोन करून विचारपूस केली. त्यावेळी अक्षय चोपडे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लालासिंग पाटील यांनी गुरुवारी ९ जूनला दुपारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नाना उखा बोरसे, अक्षय ओंकार चोपडे, दीपक गंगाराम लांघी व सुयेश गजानन तिटकरे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुरवातीला दिलेले १३ लाख ७८ हजार रुपये, शासकीय नियमानुसार त्यावरील व्याज व शेडच्या कामाची आजची किंमत अशी ४५ लाखांत फसवणूक केल्याची फिर्याद त्यांनी दिली असून, रामानंद पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT