fraud crime news esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : बिझनेस लोनच्या नावे गंडविणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आव्हाणे शिवारातील तरुणास कार व बिझनेस लोन मिळवून देण्याच्या नावाखाली २३ लाख २४ हजार ६९२ रुपयांचा गंडा घातला होता. (Frauder arrested in favor of business loans jalgaon news)

सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने तीन महिने परिश्रम घेत गुन्ह्याचा छडा लावून संशयितांना अटक केली आणि २३ पैकी २१ लाखांची रोकड जप्त केली.

आव्हाणे (ता. जळगाव) येथील साहिल वसंतराव गाढे याची फायनान्स कंपनीतील व्यवस्थापक महेश चव्हाण याच्याशी ओळख झाली होती. जुलै २०२२ मध्ये गाढे याने चव्हाण याच्या व्हॅट्‌सअ‍ॅप स्टेटसवर लोनची जाहिरात पाहिली. कार लोनची गरज असल्यामुळे साहिल गाढे याने महेश चव्हाण यास संपर्क साधून कागदपत्रे पाठविली होती.

फाइल अडकल्याचा बहाणा

महेश चव्हाण याने तुझी फाइल मुंबई कार्यालयात पाठवली असल्याचे सांगितले. काही दिवसांनी पूजा चव्हाण नावाच्या महिलेने साहिल गाढे याला दूरध्वनी करून तुमचे सिबील रेकॉर्ड खराब असल्यामुळे तुम्हाला लोन मिळणार नसल्याचे सांगितले. तुम्हाला लोनची आवश्यकता असल्यास सिबील रेकॉर्ड वाढवून दिला जाईल.

त्यासाठी प्रोसेस फी, फाइल मंजुरी, ऑनलाइन जीएसटी, आयटीआर आदी कारणे सांगून गाढे याच्याकडून वेळोवेळी एकूण २३ लाख २४ हजार ६९२ रुपये ऑनलाइन उकळले. तरीही लोन मंजूर होत नसल्याने फसवणूक झाल्याची साहिल गाढे याची खात्री झाली. याबाबत गाढे याने दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सायबरची कामगिरी

गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून सायबर पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक लीलाधर कानडे, विद्यमान निरीक्षक अशोक उतेकर, उपनिरीक्षक दिगंबर थोरात, राजेश चौधरी, स्वाती पाटील, दिलीप चिंचोले, सचिन सोनवणे, गौरव पाटील आदींनी मीरा भाईंदरला जाऊन दोन संशयितांना ताब्यात घेतले व २१ लाख ९० हजार रुपये हस्तगत केले. जप्त रक्कम पोलिस अधीक्षक एम. राजकुमार व अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या हस्ते गाढे यांना परत करण्यात आली. निरीक्षक अशोक उतेकर व सहकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 2nd T20I : शिवम दुबेच्या दोन चेंडूंनी सामना फिरवला, प्रिंस यादवने पदार्पणाचा सामना गाजवला; आयर्लंडला स्वस्तात रोखले

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

SCROLL FOR NEXT