funding
funding  esakal
जळगाव

Kamgar Kalyan Kendra : कामगार कल्याण केंद्राकडून कामगार कुटुंबीयांसाठी निधी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय जळगाव अंतर्गत १५ केंद्रांवरील कामगार कुटुंबीयांसाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी विविध योजनांद्वारे ९४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (fund of Rs 94 lakh 50 thousand has been approved by Labor Welfare Center for workers families jalgaon news)

मंडळाचे जळगाव येथे गट कार्यालय कार्यरत असून, गट कार्यालयांतर्गत जळगाव जिल्ह्यात नऊ, धुळे जिल्ह्यात चार, नंदुरबार जिल्ह्यात दोन केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांद्वारे वर्षभरात कामगार कुटुंबीयांना आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक लाभ देण्यात आले आहेत.

२०२२-२३ या आर्थिक वर्षात मंडळाच्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत एकूण २ हजार ३८३ लाभार्थ्यांना ६८ लाख २५ हजार ५०० एवढ्या रकमेचा निधी मंजूर करण्यात आला. यात सर्वसाधारण शिष्यवृत्ती अंतर्गत एकूण २,३७४ लाभार्थ्यांना ६७ लाख ३३ हजार ५०० रुपये देण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यात इयत्ता दहावी, बारावीमध्ये गुणवत्ताप्राप्त पाच विद्यार्थ्यांना एकूण पंचवीस हजार, परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत एका लाभार्थ्यास ५० हजार रुपये, क्रीडा शिष्यवृत्ती योजनेंतर्गत एका लाभार्थ्यास पाच हजार रुपये, सेवेत मृत पावलेल्या कामगारांच्या दोन पाल्यांना बारा हजार रुपये, अशी रक्कम वितरित करण्यात आली. पाठ्यपुस्तक सहाय्यता योजनेंतर्गत एकूण १६१ लाभार्थ्यांना १ लाख ५६ हजार ५५९ इतकी रक्कम वितरित करण्यात आली.

एमएस्सीआयटी सहाययता योजनेतर्गंत एकूण २१० लाभार्थ्यांना ४ लाख ८४ हजार इतकी रक्कम वितरित करण्यात आली. गंभीर आजार वैद्यकीय सहाय्यता योजनेंतर्गत एकूण ११५ लाभार्थ्यांना १९ लाख पाच हजार रक्कम देण्यात आली.

मंडळाच्या अनुदान तत्वावर शिवण यंत्रे योजनेंतर्गत एकूण १७ लाभार्थ्यांना ७८ हजार ३० रक्कम वितरित करण्यात आली, अशी माहिती कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने कोलकाताला दिला दुसरा धक्का; नारायणपाठोपाठ अर्धशतक करणारा सॉल्टही परतला माघारी

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT