Dilapidated buildings and rooms in police colony.
Dilapidated buildings and rooms in police colony.  esakal
जळगाव

Jalgaon News : प्रशासकीय इमारतीच्या विलंबामागील ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण?

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील जुन्या पोलिस वसाहतीच्या ताब्यात असलेल्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारतीला मान्यता मिळाली, तांत्रिक मान्यताही मिळाली, निधी देखील मंजूर झाला.

मात्र अद्यापही काहीही काम मार्गी लागत नसल्याने प्रशासकीय इमारतीच्या विलंबामागील झारीतील शुक्राचार्य कोण? असा उद्विग्न सवाल आमदार अनिल पाटील यांनी केला आहे. (Funds have been approved for new administrative building on site occupied by old police colony but no work has yet started jalgaon news)

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अमळनेर मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लागत असतानाच शहरातील टीपी प्लॉट नंबर ६६ - ६७ च्या १३ हजार ५०० चौ.मी. जागेवर प्रशासकीय इमारत मंजूर झाली, अर्थसंकल्पात ११ कोटी ३७ लाख ५० हजारांचा निधी मंजूर देखील झाला.

मात्र अजूनही काम सुरू झालेले नाही. प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी आमदार अनिल पाटील आक्रमक झाले असून, १२ जूनपासून मतदारसंघातील नागरिकांसोबत ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार आहेत.

आमदार न्यायालयात जिंकले, पण...

शासनाच्या नाकर्तेपणाविरोधात आमदार अनिल पाटील यांनी या जागेच्या हस्तांतरणासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली, त्यात त्यांना यश देखील आले, न्यायालयाने ७ दिवसांच्या आत ही जागा हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केले. मात्र, महिना उलटून चालला, तरी प्रशासन मात्र ढिम्म आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्हाधिकारी, एसपींची टोलवाटोलवी

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पोलिस वसाहतीची जागा खाली करण्यासाठी पोलिस अधीक्षकांना सूचना देऊन देखील त्यांनी कुठलीही कार्यवाही केलेली नसल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असावी, अशी शंका उपस्थित होत आहे.

पालकमंत्र्यांना अधिकारी जुमानेतना

आमदार अनिल पाटील यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना बैठकीतूनच फोन केले. लवकरच प्रश्न मार्गी लावतो, असे अधिकारी पालकमंत्र्यांना तात्पुरते सांगतात आणि नंतर मात्र पालकमंत्री यांचे ही ऐकत नसल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी भूमिका बदलली का?

महाविकास आघाडीच्या काळात ना.पाटील हेच पालकमंत्री होते. त्यांच्याच कार्यकाळात निधी मिळाला. मात्र सरकार बदलले महाविकास आघाडी सरकारचे पालकमंत्री आता शिंदे-फडणवीस सरकारचे पालकमंत्री झालेत. त्यामुळे ते हेतुपुरस्कर या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत का? असा सवाल अमळनेर मतदारसंघातील जनता करते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT