Meritorious students of the Nobel Science Talent Search Examination with a model of the PSLV rocket at ISRO. Along with ISRO scientists NL Prajapati, Rahul Bhadane, Jaideep Patil etc. esakal
जळगाव

Jalgaon News : ‘इस्त्रो’च्या सफरीत रमले भावी शास्त्रज्ञ; महाराष्ट्रातील 61 विद्यार्थ्यांची भेट

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : चांद्रयान ३ च्या यशानंतर सामान्य भारतीयांमध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) बद्दल मोठ्या प्रमाणात कुतूहल निर्माण झाले आहे. यात विद्यार्थ्यांचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ६१ विद्यार्थ्यांनी इस्रोला भेट दिली.

नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था आणि भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन जळगाव यांच्यातर्फे दरवर्षी महाराष्ट्रात नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन केले जाते. (Future scientists enjoyed journey of ISRO jalgaon news)

यातील गुणवंत विद्यार्थ्यांना (इस्रो), विक्रम साराभाई स्पेस ऍप्लिकेशन सेंटर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गांधीनगर, सायन सिटी यासारख्या उच्च तंत्रज्ञान संस्थांना विनामूल्य भेटीसाठी नेले जाते.

२०२२ मध्ये या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या महाराष्ट्रातील ६१ विद्यार्थ्यांचा इस्रो दौरा नुकताच झाला. विद्यार्थ्यांच्या इस्रो दौऱ्याचे हे सातवे पर्व होते. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी या प्रकारची चळवळ राबविणारी नोबेल फाउंडेशन ही एकमेव संस्था आहे.

यांची घेतली माहिती

या तीन दिवसीय अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी विक्रम साराभाई स्पेस ॲप्लिकेशन सेंटर येथे उपग्रह बनविण्याच्या पद्धती, उपग्रहांचे प्रकार रॉकेटचे प्रकार, उपग्रह पाठवण्यासाठी रॉकेटच्या इंधनांचा अभ्यास मंगळयान, चांद्रयान तसेच भविष्यात आखणी केलेल्या गगनयान संदर्भात संपूर्ण मॉडेल्स तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गांधीनगर येथे क्रिएटिव्ह कोअर लर्निंग या व्यासपीठावर आयआयटीच्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून माहिती घेतली.

आयआयटी गांधीनगरच्या अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्रंथालयाचा देखील विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. अहमदाबाद येथील सायन्स सिटीमध्ये विद्यार्थ्यांनी आशिया खंडातील एक प्रगत रोबोटिक लॅबोरेटरी रोबोटिक पार्कस मध्ये रोबोटतर्फे होणाऱ्या विविध क्षेत्रातील कार्यपद्धतीचा प्रात्यक्षिकांसह अभ्यास समजून घेतला.

वैद्यकीय क्षेत्रात रोबोटतर्फे होणारे शस्त्रक्रिया, कृषी क्षेत्रात रोबोटची भविष्यात होणारी मदत, अंतराळ क्षेत्रात अंतराळयान दुरुस्तीसाठी रोबोटची होणारी मदत यासारख्या गोष्टींचा समावेश होता. यासह भारतातील अद्ययावत तंत्रज्ञान आधारित मत्स्यालय व स्पेस पार्क ला भेट दिली. यावेळी उमविचे मुख्य वित्त अधिकारी रवींद्र पाटील, शिक्षिका शिल्पा फल्ले, शीला पाटील, आरती पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT