esakal
जळगाव

Jalgaon News : विमा प्रीमियमची रक्कम ग. स. संस्थेकडून अदा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी (ग. स.) सोसायटीच्या सदस्यांची एक हजार रुपयांची विमा प्रीमियमची रक्कम संस्थेतर्फे अदा करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष उदय पाटील यांनी दिली आहे. (g s Insurance premium amount of one thousand rupees for members of society was paid by organization jalgaon news)

याबाबत दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात त्यांनी म्हटले आहे, की संस्थेच्या सभासदांची पाच लाख रुपयांचा नैसर्गिक मृत्यू जीवन सुरक्षा विमा पॉलिसी काढण्यात आली आहे. पॉलिसीची प्रीमियम रक्कम दोन हजार ५९६ पैकी एक हजार रुपये मात्र संस्थेतर्फे अदा करण्यात आली असून, ही रक्कम सभासद वर्गणीत पूर्ववत जमा करण्यात आली आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

सभासद मृत झाल्यास शंभर टक्के कर्जमाफी, तसेच नैसर्गिक मृत्यू झाल्यास पाच लाख व अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये वारसांना आर्थिक सहाय्य दिले जाते, तथापि विमा पॉलिसीबाबत काही सभासदांकडून चुकीची व खोटी माहिती पोस्ट करून दिशाभूल केली जात आहे. तरी सभासदांनी विश्‍वास ठेवू नये, असे अवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani house firing : पाचवा आरोपी एन्काउंटरमध्ये जखमी; पोलिसांना गयावया करत म्हणू लागला...

EPFO Update: 'पीएफ'ची सगळी माहिती एका क्लिकवर; काय आहे Passbook Lite?

Kannad News : शहीदांच्या ८५ वर्षीय आई-वडिलांना दोन तासांत न्याय; तहसीलदारांची संवेदनशील भूमिका

Most Dangerous Room in the House: स्वयंपाकघर किंवा गॅरेज नाही, तर हृदयरोगतज्ज्ञांच्या मते घरातील ही खोली आहे आरोग्याच्या दृष्टिने अधिक धोकादायक

Latest Marathi News Updates : सोलापूर-मुंबई, सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून सुरु

SCROLL FOR NEXT