Arrested Sakal
जळगाव

चिठ्ठ्या ठेवून गाड्या पेटवणाऱ्या ‘गब्बर’ गँगच्या खंडणी बहाद्दरांना अटक

सिनेस्टाईल, सापळा रचत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : निमखेडी शिवारातील साईविहार कॉलनीत २९ जून रोजी मध्यरात्री अंगणात लावलेल्या दोन कार पेटवून देत १० लाखांची खंडणी मागणाऱ्या कथित गब्बर गँगच्या दोघांना तालुका पोलीसांनी मंगळवारी (ता. १२) यावल शहरातून सिनेस्टाईल, सापळा रचत अटक केली आहे. सुरेश रमेश लहासे (रा. पहूर, ता. जामनेर) आणि राजू समाधान कोळी (रा. गोदरी, ता. जामनेर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. (Latest Marathi News)

निमखेडी शिवारातील साईविहार येथील रहिवासी हरीश वरूडकर यांची कार (क्रमांक. एमएच २० डीजे ७३१६) व आनंद युवराज पाटील यांची कार (क्रमांक. एमएच १९ सीझेड ४४३०) अंगणात लावलेल्या होत्या. २९ जून रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास संशयितांनी पार्किंगला लावलेल्या दोन्ही कार पेटवून दिल्या होत्या. वाहनांना आग लावून जाळपोळ करणाऱ्यांनी चिठ्ठी लिहून १० लाख रूपयांची मागणी केली होत. चिठ्ठीच्या खाली सुलतान भाई गब्बर गँग असा उल्लेख केला आहे. त्यानुसार जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

धमकावले अन्‌ फसला

या गुन्ह्याचा शोध सुरू असताना ६ जुलै रोजी पुन्हा अज्ञात व्यक्तीने व्हॉटसॲपच्या माध्यमातून १० लाखांऐवजी १५ लाखांची मागणी करत कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ११ जुलै रोजी पुन्हा मॅसेज करून एकाच्या घरातील भाडेकरू सुरेश रमेश लहासे (रा. पहूर ता. जामनेर) राहत असलेल्या व्यक्तीकडे मोबाईल देण्यास सांगितले. त्यावरून पोलिसांना संशय आला, त्यानुसार पोलीसांनी कारवाईला सुरूवात केली.

अन्‌ दोघांना अटक

मंगळवारी (ता. १२) सकाळी अज्ञात व्यक्तीने सुरेश लहासे याला मोबाईल घेऊन यावल येथे येण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. सुरेश लहासे हा अजिंठा चौकात (एमएच २० ईजे ५९४२) कारमध्ये एकासोबत बसलेला पोलिसांना दिसून आला. पोलिसांनी कारचा पाठलाग करून यावल येथे गाठले. यावल येथील पंचायत समितीच्या आवारात गाडी लावलेली दिसून आली. पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी सुरेश रमेश लहासे आणि राजू समाधान कोळी यांना अटक केली. या दोघांनी गब्बर गँगची दहशत माजवण्यासाठी जवळपास अठरा ते विस लोकांना असे पत्र पाठवून धमकावल्याचे उघडकीस आले असून तपासात इतर बाबींचा खुलासा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT