A beautiful archway built at the entrance of the fort on the occasion of Gad Pujan and present Mawla. 
जळगाव

Jalgaon Chougaon Fort : आधी तोरण गडाला, मग माझ्या दाराला! किल्ले चौगाव येथे गडपूजन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Chougaon Fort : तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ले चौगाव येथे दरवर्षाप्रमाणे दीपावलीनिमित्ताने गडपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 'आधी तोरण गडाला, मग माझ्या दाराला' ही भावना उराशी बाळगून मावळ्यांनी मोठ्या उत्साहात गडपूजन केले. (Gad Pujan at Fort Chaugaon jalgaon news)

ज्याप्रमाणे दिवाळीला आपले घर स्वच्छ केले जाते, फुलहार, तोरण, आकाश कंदील लावून सजावट केली जाते, त्याचप्रमाणे राज्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा असलेल्या आपल्या किल्ल्याला देखील स्वच्छ करावे, गडपूजन करून त्यावर तोरण लावावे, हा उद्देश मनाशी घेऊन धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर किल्ले चौगाव येथील गडाचे गडपूजन झाले.

स्वराज्यातील गड, किल्ले हेच मावळ्यांचे धन असून, त्याच धनाचे संवर्धन आणि पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी करावी, या उद्देशाने ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समिती चोपडा, राजा शिवछत्रपती परिवार जळगाव, टीम खानदेश एक्सप्लोर, शिवशंभु प्रतिष्ठान जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा गडपूजन सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी अनेक बालमावळे, रणरागिणी आणि परिवाराचे मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मावळ्यांनी सर्वप्रथम प्रवेशद्वारावरील स्वच्छता करून गडाच्या प्रवेशद्वारावर सुंदर तोरण बांधले. गडाच्या पहिल्या पायरीला हार, तोरण, फुले, कुंकू अर्पण करत गडपूजन केले. भविष्यातही गडसंवर्धन करत राहण्याची प्रतिज्ञा घेतली. या वेळी मावळ्यांच्या घोषणांनी गड परिसर निनादून गेला.

किल्ले चौगाव आणि इतरही ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्व आणि किल्ले चौगावची ऐतिहासिक माहिती प्रताप विद्या मंदिराचे इतिहास शिक्षक पंकज शिंदे यांनी आपल्या मनोगतातून दिली. या वेळी चौगाव वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्राम तेले, महेंद्र राजपूत, नितीन पाटील, गणेश कोळी, विजय ढीवरे, दिनेश पाटील, शिवराजे शिंदे, निशांत पाटील, अवधेश पाटील, अन्विषा पाटील आणि मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply Crisis India : एलपीजीबाबत मोठी अपडेट समोर ! नवीन कनेक्शन्स मिळणार की नाही? सरकारने नेमकं काय सांगितलं...

Jal Jeevan Mission: कोट्यवधींचा जलजीवन मिशन फेल; टाकळी-परिसरात पाणी असूनही ग्रामस्थ तहानलेले

Latest Marathi News Live Update: NCB नार्कोटिक्स विभागाचा फलक मराठीत करण्याची मागणी

Government Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ३९ लाखांची फसवणूक; सेवानिवृत्त उपप्राचार्यावर गुन्हा

Deglur Shahajinagar bus stand delay: देगलूर शहाजीनगर बसस्थानकाचे नूतनीकरण दीड वर्षांपासून रखडले; पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न केल्यास कंत्राटदारावर कडक कारवाईचा इशारा

SCROLL FOR NEXT