gang rape
gang rape  esakal
जळगाव

Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

चंद्रकांत चौधरी

पाचोरा (जि. जळगाव) : तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय मुलीवर गावातीलच पाच ते सहा नराधमांनी उचलून नेत सामूहिक लैंगिक अत्याचार (Gang rape) केल्याचे प्रकरण उघडकीस आले असून, यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिस संशयितांच्या शोधात गुंतले आहेत. (Gang Rape on a minor girl Jalgaon Crime News)

ग्रामीण भागातील एका गावात १४ वर्षीय मुलगी शुक्रवारी (ता. १३) रात्री गल्लीतच मैत्रिणींसोबत गप्पा मारत उभी होती. घराकडे परतत असताना ती गायब झाली. उशिरापर्यंत घरी न आल्याने तिचा शोध घेण्यात आला. गावातील २० ते २५ दुचाकीस्वारांनी मध्यरात्रीपर्यंत गावाचा परिसर व शेतशिवार पिंजून काढले. गावातीलच पाच ते सहा नराधमांनी या अल्पवयीन मुलीला उचलून नेत तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला व पहाटे तीनच्या सुमारास गावालगतच्या महिला शौचालयाजवळ मुलीस सोडून ते पसार झाले.

पीडित बालिका विव्हळत घरी आल्यावर हा प्रकार कळाला. पीडित बालिकेस पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसात नोंद नसली तरी पीडितेचा जबाब नोंदविण्यात आला असून, ती प्रचंड भांबावलेली असल्याने व तिची मानसिक अवस्था ठीक नसल्याने जबाब देण्यात अडचणी आहेत. नराधम संशयित गावातीलच असल्याचे सांगण्यात येत असून, पोलिस पथके त्यांच्या शोधार्थ रवाना झाली आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT