Police Inspector Jaipal Hire along with seized ganja and other items. Other officers and police personnel in the neighborhood esakal
जळगाव

Jalgaon : 8 लाखांचा गांजा पकडला; कार खड्ड्यात टाकून चौघे पसार

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : जळोदहून अमळनेरकडे येणाऱ्या कारमधून पोलिसांनी आठ लाखांचा ५३ किलो गांजा जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली कार, दुचाकी, मोबाईल असा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १८) पहाटे एकच्या सुमारास जळोद रस्त्यावर घडली.

पोलिस निरीक्षक जयपाल हिरे गुरुवारी (ता. १७) रात्री विभागीय गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार जळोद- अमळनेर रस्त्यावरून एका कारमध्ये गांजा विक्रीसाठी अमळनेर शहरात आणला जात होता.

हिरे यांनी तत्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांना माहिती देऊन पोलिस कर्मचारी किशोर पाटील, मिलिंद भामरे, दीपक माळी, रवींद्र पाटील, सूर्यकांत साळुंखे, चालक सुनील पाटील याना घेऊन विजयनाना कृषी महाविद्यालयाजवळ सापळा लावला. (Ganja worth eight lakhs seized near Amalner Cinestyle chase by police Throwing car into ditch four of them spread out Jalgaon News)

शुक्रवारी (ता. १८) पहाटे एकच्या सुमारास एक पांढरी कार आणि त्याच्या पुढे दुचाकी येताना दिसल्याने पोलिसांनी त्यांना अडविण्यासाठी यंत्रणा सतर्क करताच कारचालक आणि दुचाकीचालक यांनी वाहने वळवून उलट्या दिशेने पळू लागले. पोलिसांनीही लागलीच वाहनात बसून त्यांचा पाठलाग सुरू केला.

बचावासाठी संशयितांनी आपली वाहने नंदगाव रस्त्याला वळवली. संशयितांना आपण पोलिसांच्या तावडीत सापडू याची जाणीव झाल्याने त्यांनी कार खड्ड्यात टाकली आणि तेथून उतरून पळ काढला. पोलिस वाहनाच्या प्रकाशात कारमधून उतरणारा सराईत गुन्हेगार तौफिक शेख मुशिरोद्दीन (रा. गांधलीपुरा) हा असल्याची ओळख पटली. त्याच्यासोबत असलेले आणखी तीन अनोळखी देखील पळून गेले.

पोलिसांनी कार (जीजे ०९, एबी ६८३९)ची डिक्की उघडली असता त्यात तीन गोण्यांमध्ये ८ लाख २ हजार ५०० रुपये किमतीची ५३ किलो ५०० ग्रॅम वजनाची २५ गांजाची पाकिटे आढळून आली. संशयितांनी सोडून दिलेली दुचाकी (एमएच १९, बीएक्स ५९२८) आणि दोन मोबाईल असा एकूण १२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस कर्मचारी संदेश पाटील, पोलिस नाईक शरद पाटील, शेखर साळुंखे, सिद्धांत शिसोदे, उदय बोरसे यांच्या मदतीने पहाटे पंचनामा करून तौफिक शेखसह अन्य तीन संशयितांवर अमली पदार्थविरोधी (एनडीपीएस) कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT