Dated Khurd (Tat. Pachora) : Confiscated Gutkha. esakal
जळगाव

Jalgaon News : तारखेडा येथे गोदामातून 26 लाखांचा गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : तारखेडा खुर्द (ता. पाचोरा) येथील गोदामात साठवून ठेवलेला २६ लाख ८६ हजार ३६० रुपयांचा गुटखा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जप्त करण्यात आला आहे. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे. इतर दोघे फरार आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना तारखेडा खुर्द येथील एका घरात प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला यांची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फौजफाटा सोबत घेऊन गुरुवारी (ता.२) रात्री छापा टाकला. (Godown at Tarkheda Gutkha worth 26 lakhs seized case has been registered against three Jalgaon News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

पोती व प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये साठवून ठेवलेला २६ लाख ८६ हजार ३६० रुपयांचा गुटखा पंचनामा करून जप्त करून तो पाचोरा पोलिस ठाण्यात आणला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला अटक करण्यात आली आहे.

दोघे फरार असून, त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांनी ही कारवाई केली.

पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, योगेश गणगे तपास करीत आहेत. हा साठा नेमका केव्हा व कोठून आणला? या त्याचा मालक कोण? पुरवठा करणारा कोण? याच्या मुळाशी जाऊन पोलिस तपास करत आहेत. यात अनेक मोठे मासे पोलिसांनी गळाला लावावेत, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : एमपीएससी सचिवांना काळं फासल्याप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

SCROLL FOR NEXT