जळगाव/जामनेर : येत्या जनगणनेत बंजारा, लबाना आणि नायकडा समाज, जनजाती, लिंगायत व सर्व सनातन धर्मियांनी आपला धर्म ‘हिंदू’ म्हणून लिहावा.
देशविघातक शक्तिकडून हिंदू समाजात फूट पाडून देशाचे तुकडे करण्याचे षडयंत्र रचले जात असून त्यास बळी न पडता आपली ओळख हिंदू हीच हवी, असे आवाहन हिंदूभूषण श्याम महाराज यांनी केले. (Godri Kumbh Mela Update Write Hindu before religion in census Saying by Hindubhushan Shyam Maharaj Jalgaon News)
जामनेर तालुक्यातील गोद्री येथे पाच दिवसांपासून आयोजित अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा लबाना नायकडा समाज कुंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. धर्मसभेच्या मंचावर अमर लिंगनाजी, रायसिंग महाराज, यशवंत महाराज, नरोत्तम प्रकाशस्वामी, रा.स्व संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, रामानंदचार्य, राजराजेश्वराचार्य गोपाल चैतन्य महाराज, अर्जुन महाराज, सिन्द्रराव महाराज, कबीरदास महाराज, बद्ददुनायक, बाबूसिंग महाराज, जितेंद्रनाथ महाराज, कैलास महाराज उपस्थित होते.
हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा
अमर लिंगनाजी म्हणाले,‘ घर वापसी झाली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. देशाला इस्लामी व इसाई बनविण्यासाठी प्रयत्न होत आहेत, याबाबत आपण कुंभानंतर तांड्यावर जाऊन प्रबोधन करणार आहोत. रायसिंग महाराज यांनी आपण हिंदू आहोत, वैदिक समाज, संस्कृती आणि धर्म जपा असे सांगितले.
यशवंत महाराज यांनी कुंभला विरोध करणाऱ्यांचा चांगला समाचार घेतला. एकजूट महत्वाची आहे. भारतातील बंजारा समाज एकत्र आले याचा काही जणांना त्रास होतो आहे, असे त्यांनी म्हटले.
नरोत्तम स्वामीजी यांनी उपदेशात बंजारा समाजाने आपला धर्म कधी त्यागला नव्हता, भगवान राम व कृष्णाचा सेवक हा समाज आहे. आपण गौ सेवा करणारे आहोत. सनातन धर्मावर निष्ठा ठेवा, आपले इष्टदेव समान आहेत. हिंदुत्वाचा मार्ग सोडू नका, असे आवाहन केले.
कर्नाटक येथील मंत्री प्रतापराव यांनी जे काम आम्ही करायला पाहिजे, ते काम धर्म जागरण करत आहे. तांड्यांवर जा, हिंदू धर्माची माहिती द्या. आपली संस्कृती आणि स्वाभिमान जपा, हिंदू धर्माचे रक्षण करा, मुलांना शिकवा असे सांगितले.
जाती- पंथ विविध, पण धर्म एकच : जोशी
धर्माच्या मार्गावर चालणारा हिंदू समाज, आपला समाज निद्रा अवस्थेत जातो, कर्तव्य विसरतो तेव्हा संत आपल्याला जागृत करतात. ही जागरण प्रक्रिया निरंतर चालत राहिली पाहिजे. आपल्याला जागृत व्हायचे आहे आणि संघटितही व्हायचे आहे. दृष्ट आणि हिंदू विरोधी शक्तींच्या विरोधात आपण सजग राहू, असे आवाहन त्यांनी केले.
कुंभानंतर खरे काम सुरु
हिंदूभूषण श्याम महाराज म्हणाले, आम्ही किती दिवस धर्मांतराच्या समस्येवर रडत बसणार आहोत. आपलं खर काम कुंभ झाल्यावर असणार आहे. सर्वांनी आपल्या गावाकडे तांड्यावर गेल्यावर आपले संघटन तयार करा. संघटित झालो तर आपल्या गावात धर्मांतरासाठी समोर येण्याची कोणी हिम्मत करणार नाही. त्यासाठी धर्म जागरण सोबत मिळून काम करावे लागेल. येत्या जनगणनेत आपण सर्वांनी आपला धर्म हिंदू लिहा, तुम्ही हिंदू ना लिहिण्यासाठी षडयंत्र सुरू आहेत. आपण सर्वांनी जागरूक राहायला हवं असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.