Gold Silver Price Update news esakal
जळगाव

Jalgaon : सोने 600 तर चांदी 1500 एकाच दिवसात वधारली; डिसेंबरअखेर सोन्याचा दर 60 हजारांवर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तुलसीविवाह झाल्यानंतर सुरु होत असलेल्या लग्नसराईमुळे सोने, चांदीच्या दरात आतापासूनच वाढ होवू लागली आहे. एकाच दिवसात सोन्याच्या दरात सहाशे (एक ग्रॅम) तर चांदीच्या दरात किलोमागे दीड हजारांची (जीएसटी विना) वाढ झाली आहे. सुवर्ण व्यावसायिकांच्या अंदाजानुसार डिसेंबर अखेर सोन्याचा दर साठ हजारांचा टप्पा प्रती तोळा गाठण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना सोने खरेदी करताना थोडी आर्थिक झळ अधिकची सोसावी लागणार आहे.

नुकताच दिवाळीचा सण धूमधडाक्यात साजरा करण्यात आला आहे. धनत्रयोदशीपासून सोने खरेदी वेगात सुरु झाली आहे. दिवाळीच्या काळात २२ ते २७ नोव्हेंबर दरम्यान सूर्यग्रहणाचा दिवस वगळता इतर दिवशी सोने, चांदीचे दागिने खरेदीस ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीजला सोन्याची प्रचंड विक्री झाली. (Gold by 600 and silver by 1500 in single day hike Gold rate 60 thousand end of December Jalgaon News)

धनत्रयोदशीला सोन्या-चांदीचा जो दर होता (सोन्याचा दर प्रतितोळा ५१ हजार, तर चांदीचा प्रतिकिलो ५९ हजार होता). तोच दर पाडवा, भाऊबीजेपर्यंत नंतर २८ ऑक्टोबर पर्यंत कायम होता. त्यानंतर २९ ऑक्टोबरला सोन्याच्या दरात दोनशे तर चांदीच्या दरात पाचशेची घट झाली होती. आज सोन्याच्या दरात ६०० ची वाढ तर चांदीत १५०० रुपयांची वाढ झाली. आजचे दर सोने प्रती तोळा ५१ हजार ४०० तर चांदी ६१ हजारांवर (जीएसटी विना) पोचली आहे.

सोन्याचे काही दिवसांतील दर असे (जीएसटी विना)

तारीख--सोने -प्रती तोळा--चांदी-प्रती किलो

२२ ऑक्टोबर --५१ हजार--५९ हजार

२९ ऑक्टोबर --५० हजार ८००--५८ हजार ५००

३१ ऑक्टोबर--५० हजार ६००--५९ हजार

२ नोव्हेंबर--५१ हजार--५८ हजार ५००

३ नोव्हेंबर--५० हजार ६००--५९ हजार

४ नोव्हेंबर--५० हजार ८००--५९ हजार ५००

५ नोव्हेंबर--५१ हजार ४०० --६१ हजार

"दिवाळीच्या सणानंतर लवकरच लग्नसराई सुरू होणार आहे. यामुळे आकर्षक प्रकारचे दागिने उपलब्ध करण्यात आले आहेत. लग्नसराईसाठी खास दागिने ते ग्राहकांना पसंतीस पडतील, असा विश्‍वास आहे. सोने, चांदीचे दर आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असतात. मागणी वाढली की दर वाढतात, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने, चांदीच्या मागणी वाढली असेल यामुळे दर वाढलेले असू शकतात."

मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: इंदापूरमध्ये तीव्र राजकीय संघर्ष, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी

Kolhapur Local Body Election : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील निकाल स्पष्ट; मुरगूडमध्ये मुश्रीफ गटाला धक्का, हातकणंगलेत काँग्रेसचा वरचष्मा

Solapur : स्ट्राँग रूमची चावी हरवली, शेवटी अधिकाऱ्यांनी कुलूप तोडलं; मतमोजणीला उशिरा सुरुवात

Latest Marathi News Live Update: उपचार सोडून उमेदवार थेट रुग्णवाहिकेतून मुलाखत द्यायला अजित पवारांकडे दाखल

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

SCROLL FOR NEXT