hospital (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : ‘आपला दवाखाना’ उपक्रम डॉक्टराविना कुलूपबंद; ‘एमबीबीएस’ डॉक्टर मिळेना

शासनाने शहरात महापालिकेतून आपला दवाखाना व आरोग्यवर्धिनी केंद्र उघडण्याचा मोठा गाजावाजा केला आहे. परंतु मंजूर १७ पैकी केवळ १० दवाखान्यांना जागा मिळाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शासनाने शहरात महापालिकेतून आपला दवाखाना व आरोग्यवर्धिनी केंद्र उघडण्याचा मोठा गाजावाजा केला आहे. परंतु मंजूर १७ पैकी केवळ १० दवाखान्यांना जागा मिळाली आहे. प्रत्यक्षात एकच सुरू आहे.

उर्वरित नऊ दवाखाने तयार आहेत, पण त्यांना एमबीबीएस डॉक्टर मिळत नाही, ‘बीएएमएस’ डॉक्टर भरतीबाबत महापालिकेने मागविलेल्या सविस्तर माहितीचे अद्यापही उत्तर आले नाही. (government has opening its hospital through municipal corporation But out of 17 approved only one is actually running jalgaon news)

एकुणच महापालिकेच्या दवाखान्याचा गाजावाजा तूर्तास तरी बंदच आहे. तसेच दवाखाने सुरू होणाऱ्या विषयी प्रश्‍नचिन्ह आहे सर्वसामान्य भागातील नागरिकांना महापालिकेकडून मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा वाऱ्यावरच आहेत.

केंद्र शासनातर्फे महापालिकेतर्गंत प्रत्येक प्रभागात आपला दवाखाना तसेच आरोग्यवर्धिनी दवाखाने सुरू करण्यात येत आहे. जळगाव शहरात असे १७ दवाखाने मंजूर आहेत. त्यापैकी केवळ दहा दवाखान्यांना जागा मिळाली आहे. तर उर्वरित सात दवाखान्यांना अद्याप शहरात जागा मिळालेली नाही.

१० पैकी १ सुरू

महापालिकेतर्फे दहा आपला दवाखान्यांना जागा मिळाली आहे. परंतु त्या पैकी एकच दवाखाना सुरू आहे.याबाबत अधिक माहिती घेतली असताना सांगण्यात आली की, शासनाने या दवाखान्यांना एमबीबीएस पदवीधारक डॉक्टर सक्तीचे केलेले आहेत. ते मिळत नसल्याने उर्वरीत नऊ दवाखाने अद्याप सुरूच नाहीत.

बीएएमएस साठी प्रतिक्षा

एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याचे ‘बीएएमएस’ पदवीधारक डॉक्टर भरण्याची परवानगी द्यावी असे पत्र महापालिकेने दिले होते. शासनाने त्याला मंजुरी दिली आहे.परंतु त्यासंबंधी सविस्तर माहिती द्या असे पत्र शासनाला महापालिकेने पाठविले परंतु शासनाने त्यावर अद्यापही खुलासा केलेला नाही.

त्यामुळे ही भरती अद्यापही झालेली नाही.केवळ शासनाच्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे जळगावातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळण्याचा खोळंबा झाला आहे.

एमबीबीएस भरतीसाठी आम्ही जाहिरात दिली होती, सतरा जागांसाठी केवळ तीन डॉक्टर आले होते त्यांची भरती प्रक्रिया सुरू आहे. परंतु अद्यापही डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. बीएएमएस भरतीबाबत शासनाच्या सविस्तर अहवालाची आम्ही प्रतिक्षा करीत आहोत.- डॉ.राम रावलानी वैदयकिय अधिकारी, जळगाव महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT