Unauthorized use of police plates on private vehicles has increased in this way. esakal
जळगाव

खासगी वाहनांवर सरकारी पाट्या; ‘महाराष्ट्र शासन’, ‘पोलिस’ नावांचा सर्रास वापर

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. नाशिक) : सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना सरकारी वाहने उपलब्ध करून देत असली तरी काही कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांकडून खासगी वाहनांवर सरकारी नावाच्या पाट्यांचा सर्रास दुरुपयोग होताना सध्या पाहायला मिळत असून, परिवहन व पोलिस प्रशासनाने यावर योग्य पाऊले उचलायला हवीत, अशी सामान्य लोकांची अपेक्षा आहे. (government plates on private vehicles Widespread use of the names Government of Maharashtra Police Jalgaon Latest Marathi News)

अनेक खासगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’, ‘पोलिस’, ‘अत्यावश्यक सेवा’, ‘प्रेस’ नाव लिहिलेल्या पाट्यांचा वापर काही अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून खासगी वाहनात सर्रास करत असतात, यामुळे बऱ्याचदा टोलनाके, सार्वजनिक पार्किंग किंवा इतर ठिकाणी वाद उद्भवतात. प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर देखील याचा अवैध वापर वाढला आहे.

सरकारने सरकारी वाहने पुरवून देखील सरकारी अधिकारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून खासगी वाहनांचा वापर सरकारी वाहन म्हणून केला जातो. यासाठी अनधिकृत पाट्या, लोगो यांचा वापर वाढला आहे. अशा वाहनांवर कायदेशीर कारवाई करून चाप बसावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र पुरविले असताना देखील वाहनांवर अनधिकृत पाट्या लावण्याचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारांकडून देखील या नावाच्या पाट्यांचा वापर होण्याची शक्यता असते, यामुळे परिवहन विभाग व पोलिस प्रशासनाने यावर कठोर कारवाई करून अनधिकृत पाट्यांचा होणारा वापर थांबवावा.

असा आहे नियम

दुचाकी, चारचाकी वाहनांवर पोलिस अधिकारी व कर्मचारी 'पोलिस' असे लिहितात. पोलिसांचा लोगो असलेले स्टीकर लावतात. अनेकदा पोलिसांव्यतिरिक्त त्यांच्या नातेवाईकांकडून पोलिसाच्या नावाचा गैरवापर केल्याचे प्रकार घडलेले आहेत. अशा प्रकारे 'पोलिस' पाटी लावून खासगी वाहन चालवित असल्याबाबत उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सर्व नागरिकांना समान कायदा या तत्त्वानुसार पोलिसांनीच कायद्याचे उल्लंघन करणे, हे पोलिसांची प्रतिमा मलीन करण्यासारखे आहे. अशा प्रकारे 'पोलिस' पाटी लावलेली वाहने नाकाबंदी व सुरक्षा तपासणी न होता सोडतात. पोलिस पाटीचा गैरउपयोग होऊन नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT