Vadhoda (Dt. Chopra): Provincial Officer Seema Ahire, Tehsildar Anil Gavit and Sarpanch, former Chairman Gokul Patil were present in the Gram Sabha
Vadhoda (Dt. Chopra): Provincial Officer Seema Ahire, Tehsildar Anil Gavit and Sarpanch, former Chairman Gokul Patil were present in the Gram Sabha esakal
जळगाव

Jalgaon News : वाळू उपशाविरोधात ग्रामसभा एकवटल्या

सकाळ वृत्तसेवा

चोपडा : तालुक्यातील वढोदा व तांदलवाडी येथील तापी नदीपात्रातील भरमसाठ वाळू उपसा झाल्याने परिसरातील जलस्त्रोतांची पाण्याची पातळी कमी झाली आहे. भविष्यात अजून पाणीपातळी कमी होईल, यासाठी ग्रामस्थांनीच या विरोधात ‘एल्गार’ पुकारला असून, तालुक्यातील वढोदा व तांदलवाडी येथील ग्रामसभांमध्ये वाळू लिलावास ग्रामस्थांकडून कडाडून विरोध करण्याचा निर्णय विशेष ग्रामसभेत घेण्यात आला.

सद्यस्थितीत कूपनलिकांना १६० फुटांवर पाणी आहे. उन्हाळ्यात ही परिस्थिती आणखी बिकट होईल. वाळू वाहतूकीसाठी गावातील रस्त्यांचा वापर होत असल्याने अपघात होण्याची व रस्त्यांची दुरावस्था होण्याची शक्यता आहे.

या कारणांसाठी सारे ग्रामस्थ एकवटले आणि वढोदा येथील तापी नदी पात्रातील वाळू लिलावास ग्रामस्थांकडून कडाडून विरोध करण्याचा निर्णय विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली असून, त्यांच्या आदेशानंतर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली वढोदा ग्रामपंचायत कार्यालयामार्फत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. (Gram sabhas united against Sand Upasha Opposition to auction in many villages including Vadhoda Tandalwadi in Chopda taluka Jalgaon News)

या ग्रामसभेस तहसीलदार अनिल गावित, मंडळ अधिकारी रवींद्र माळी, सरपंच, पंचायत समिती माजी सभापती गोकुळ पाटील, गावातील आजी माजी पदाधिकारी, मोहिदा येथील तलाठी कोळी, वढोदा येथील तलाठी वंदना कोळी तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने हजर होते. ग्रामसेवक भरत पाटील यांनी आभार मानले.

मागील ग्रामसभेत वाळू लिलावास ग्रामस्थांचा विरोध असल्याचा ठराव केला होता. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांचा विरोध का आहे, याची कारणे जाऊन घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष आदेशान्वये प्रांताधिकारी यांना ही सभा घेण्यास सांगितले होते. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी नदीपात्रातील वाळू चोरीस जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे सांगितले.

तालुक्यात अशाच पद्धतीने काही ग्रामपंचायतीने नदीपात्रातील वाळूचा लिलाव करण्यास विरोध केलेला आहे. अशा ग्रामपंचायतींमध्ये प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा होणार आहेत.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

वाळूमाफियांना बसेल चाप

‘गाव करी ते राव काय करी..! अशी एक म्हण प्रचलित आहे. गावकऱ्यांच्या या एकजुटीमुळे बेमुर्वतपणे शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला करून तर कधी संगनमत करुन नदीपात्रातून बेसुमार, नियमबाह्य वाळूचा उपसा करणाऱ्या वाळूमाफियांना यामुळे चाप बसणार आहे. एकंदरीत भरमसाठ अवैधरित्या होणारा वाळू उपसा करताना तापी नदी ओरबाडली जाते. तिचे किती उत्खनन होते? याकडे लिलाव दिल्यानंतर दुर्लक्ष होते. यात यंत्रणाही तितकीच जबाबदार आहे.

यात यंत्रणेतील काही महाभागांचे ‘अर्थ’पूर्ण साटेलोटे असते. यामुळे यंत्रणा काहीअंशी दुर्लक्ष करते. यामुळे मात्र हजारो टन वाळूचा उपसा होतो. नुकसान मात्र गावकऱ्यांचे होते. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते, शेकडो कूपनलिकांची पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. याकडे कोण लक्ष देणार? हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT