Guardian Minister Gulabrao Patil speaking at the Republic Day program on Friday. Neighbor Collector Ayush Prasad.
Guardian Minister Gulabrao Patil speaking at the Republic Day program on Friday. Neighbor Collector Ayush Prasad. esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्यात शेतकरी ह‍ित, पायाभूत सुव‍िधांचे जाळे : पालकमंत्री पाटील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शेतकरी, वंच‍ित, दुर्लक्ष‍ित घटक, सर्वसामान्य नागर‍िक यांच्या जीवनात शासकीय योजना व मदतीच्या रूपाने नवी पहाट आणण्याचे काम शासन करीत आहे. ‍ज‍िल्ह्यात पायाभूत सुव‍िधांचे जाळे न‍िर्माण करण्यात येत आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या ह‍िताला व जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाला सर्वोच्च प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे द‍िली.

भारतीय प्रजासत्ताक द‍िनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदानावर शुक्रवारी (ता. २७) मुख्य ध्वजवंदन झाले. त्या वेळी शुभेच्छा संदेशात पालकमंत्री पाटील बोलत होते. (Guardian Minister Gulabrao Patil statement of will give highest priority to interest of farmers and comprehensive development of district jalgaon news)

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी अंकुश प‍िनाटे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, प्रांताधिकारी महेश सुधळकर.

तहसीलदार नामदेव पाटील, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, की जिल्ह्यात २०२२ व २०२३ या वर्षात नैसर्ग‍िक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या ८९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ८३ कोटींची नुकसानभरपाई.

चालू वर्षाच्या खरीप हंगामामध्ये सात तालुक्यांतील २७ महसूल मंडळात २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यामुळे प्रधानमंत्री पीकविमा योजनेत जिल्ह्यातील एक लाख ४३ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ७६ कोटी ४० लाखांची विमा भरपाई, २०२२- २३ या वर्षात ८० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४८ कोटी ४५ लाखांची पीकविमा रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना पीककर्ज, अनुदानाचे वाटप

पालकमंत्री पाटील म्हणाले, की जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून चालू वर्षात एक लाख ७७ हजार शेतकऱ्यांना ८७१ कोटी ६९ लाखांचे खरीप पीककर्ज वाटप झाले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत चालू आर्थ‍िक वर्षात जवळपास २६ टक्क्यांनी ते जास्त आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेत जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना ७९९ कोटी ५३ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत एक लाख ६१ हजार शेतकऱ्यांना ९२१ कोटी ६१ लाखांच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला. ५६ हजार शेतकऱ्यांना २१२ कोटी ३६ लाखांचे प्रोत्साहनपर अनुदान वितरित करण्यात आले.

ज‍िल्हा राज्यात अव्वल

जिल्हा वार्ष‍िक योजनेत अनुसूचित जाती उपयोजनेत ९२ कोटीपैकी ४६ कोटी निधी खर्च झाला आहे. निधी खर्चात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्हा वार्ष‍िक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत २०२३-२४ वर्षात अर्थसंकल्पित निधीशी खर्चाची टक्केवारी ९७ टक्के आहे. निधी खर्चात आदिवासी यावल प्रकल्प कार्यालय राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

पोलिस दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, पोलिस बॅन्ड पथक, डॉग युनिट यांसह ज‍िल्ह्यातील व‍िव‍िध शाळांमधील २० पथकांनी संचलन केले. हर्शल पाटील व देवीदास वाघ यांनी सूत्रसंचालन केले. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, पुरस्कारार्थी व शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

यांचा झाला सन्मान

* युनिट २३० बटाल‍ियन सीआरपीएफ देशांतर्गत सुरक्षासंबंधी ऑपरेशनमध्ये मलिवादा (जि. दंतेवाडा, छत्तीसगड) येथील जंगलक्षेत्रात गस्त घालताना माओवाद्यांनी लावलेल्या आयईडी स्फोटामध्ये ३० मार्च २०१६ ला जवान नाना सैंदाणे शहीद झाले.

त्यांच्या शौर्याच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनातर्फे त्यांच्या पत्नी नीता सैंदाणे यांना ताम्रपट देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

* महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत उल्लेखनीय कामग‍िरीबद्दल डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाव‍िद्यालय व रुग्णालय यांचा सन्मान करण्यात आला.

* कलाबाई च‍िंतामण कोळी, कमलबाई रमेश गायकवाड (मोहाडी) व श‍िवलाल गरिमा सोनवणे (देवगाव) यांना जागेचा मालकी हक्क व नकाशाची सनद प्रदान करण्यात आली.

* इट राइट कॅम्पस अंतर्गत उल्लेखनीय कामग‍िरीबद्दल अन्न व औषध प्रशासन व‍िभागाचा सन्मान करण्यात आला.

* कौशल्य रोजगार, उद्योजकता व नावीन्यता जिल्हा कार्यकारी समितीमार्फत पुरस्कार : वैष्णव चौधरी, पायल घुले, गायत्री पाटील, गौरी पाटील, द‍िनेश पावरा, पायस सावळे, ह‍ितेश पाटील, प्रवीण पाटील, ओम पाटील, सायमा गवळी यांना प्रत्येकी एक लाख रुपये बीजभांडवल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT