Gulabrao Patil
Gulabrao Patil esakal
जळगाव

Gulabrao Patil : 'चार खांदेकरी गेल्यानंतर एकटा ‘आग्या’ने काय करावे?' शिवसेना का सोडली याचं सांगितलं कारण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नागपूरपासून तर थेट नाशिक, मुंबईपर्यंतचे शिवसेनेचे सर्व आमदार शिवसेनेला (ठाकरे) सोडून गेले होते, मी एकटाच राहून काय करणार होतो, त्यामुळे मी सुद्धा गेलो. (Gulabrao Patil statement about shiv sena jalgaon news)

सत्तेत असल्याने मी जिल्ह्याचा विकास करू शकतोय अशी भावना शिवसेना शिंदे गटाचे नेते, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी व्यक्त केली. जळगाव जिल्ह्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते.

साळवे (ता.धरणगाव) येथे विकासकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले,‘ लोक आम्हाला गद्दारी केली, गद्दारी केली असे म्हणतात, पण मी तर तेहतीसाव्या क्रमांकावर गेलो, अगोदर ३२ आमदार गेले होते.

माझ्या जागी तुम्हीही असता तर काय केले असते? जळगाव जिल्ह्यात पाच आमदार होते, त्यापैकी चार आमदार शिवसेनेत गेले होते, मी एकटाच राहिलो, मी नजर मारली नागपूरकडे तेथील आमदारही गेले, बुलढाण्याचेही गेले, नाशिक, ठाणे आणि दादरचेही गेले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नागपूर ते मुंबई दरम्यान मी एकटा राहिलो, मी काय करणार होतो? मी गेलो नसतो तर एवढा विकास झाला असता का? जळगावचे चारही शिवसेनेचे आमदार गेले, चार खांदेकरी गेल्यानंतर एकटा ‘आग्या’ने काय करावे? म्हणून मी पण निर्णय घेतला.

भागो, आणि मी गेलो. माझ्यावर टीका सुरू झाली, काय झाडी, काय डोंगर अशी अनेक दूषणे आपणास देण्यात आली. पण मी चुकीचा निर्णय घेतला असता, तर आज शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये आपण जेवढी कामे मतदारसंघात झाली आहेत. तेवढी कामे झाली नसती. मी मूळ ट्रॅकमध्ये आलो. माझ्यावर आज टीका करीत आहेत, त्यांनी विचार करावा.

मला हे मंत्रिपद अगदी सहज मिळाले नाही. मला तुरुंगवास पत्करावा लागला, आंदोलने केली, आम्ही आयुष्य विरोधात घातले, मी ठाकरे गट सोडला नसता, तर मंत्रिपद गेलं असत, कदाचित आमदारकीही गेली असती. परंतु आम्ही सट्टा खेळलो. आम्ही हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तसेच भगव्या झेंड्याच्या रक्षणासाठी भाजपबरोबर गेलो आहोत. हे जर आम्ही पाप केलं असेल तर जनता निश्‍चितच त्याचा विचार करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : संभाजीनगरमध्ये सिलिंडर स्फोट, बालिका ठार, पाच जखमी

SCROLL FOR NEXT