Guardian Minister Gulabrao Patil while cutting the ribbon and inaugurating the Prinprala Railway Flyover.  esakal
जळगाव

Jalgaon News : प्रिंप्राळा उड्डाणपुलामुळे होणार वेळेची बचत : गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव शहर व उपनगरांना जोडणारा प्रिंप्राळा रेल्वे उड्डाणपूल जळगावकरासाठी वेळेची बचत करणारा आणि वाहतुकीची कोंडी सोडविणारा आहे. कमी कालावधीत पुलाचे काम झाले आहे.

मार्च महिन्यात असोदा रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन होईल, असे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिले.(Gulabrao Patil statement of Pimprala flyover will save time jalgaon news )

पिंप्राळा गेटवरील रेल्वे उड्डाणपुलाचे नागपूरहून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण झाले. या कार्यक्रमात जळगावहून सहभागी झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री पाटील बोलत होते.

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेष पाटील, माजी महापौर जयश्री महाजन, महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, तहसीलदार अर्पित चव्हाण, महारेलचे सरव्यवस्थापक निशांत जैन, भुसावळ रेल्वे प्रशासनाचे प्रबंधक संजय बिराजदार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले,‘ प्रिंप्राळा उड्डाणपुलाचे भूमिपूजन २७ फेब्रुवारी २०२२ ला माझ्याच हस्ते झाले. त्यानंतर आता दोन वर्षाच्या कालावधीच्या आत या पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे मला भाग्य लाभले. पुलाचे वेळेत काम पूर्ण करण्याचे श्रेय मक्तेदारास जाते.

जळगाव शहर व जिल्ह्यातील निराशेचे वातावरण दूर होत आहे. रस्त्यांच्या कामांसाठी मनपाला जिल्हा नियोजन मधून सव्वाशे कोटी रुपये देण्यात आले आहेत.खेडी-भोकरी-भोकर पुलाचे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे.

प्रिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे फीत कापून उद्घाटन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील. सोबत खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, माजी महापौर जयश्री महाजन आदी.

निम्न-तापी-पाडळसे प्रकल्पास मंत्रिमंडळाने साडेचार हजार कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे पाच तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे. बंधारासह बांभोरी पूल व्हावा यासाठी प्रयत्न आहे.

कनेक्टिव्हिटी वाढणार : महाजन

ग्रामविकास मंत्री महाजन म्हणाले की, प्रिंप्राळा उड्डाणपुलामुळे शहराची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. शहरातील सर्व रस्ते आता सिमेंटचे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात २५० कोटी खर्चून विभागीय क्रीडा संकुल साकार होणार आहे.

जिल्ह्यात देशातील पहिले मेडिकल हब साकार होत आहे. येत्या दोन वर्षांत याचे बांधकाम पूर्ण होणार आहे. जलसंपदा विभागाचे अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत. शहर व जिल्हा विकासाकडे वाटचाल करत आहे.

यावेळी खासदार पाटील, आमदार भोळे यांचीही भाषणे झाली. उड्डाणपुलासाठी जमिनी दिलेले शिवाजी भोईटे, लता भोईटे यांच्यासह इतरांचा सत्कार करण्यात आला. उड्डाणपुलाचा प्रकल्प वेळेत पूर्ण केल्याबद्दल मक्तेदार प्रताप शेखावत यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. सुधीर कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले.

मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन कार्यक्रमाच्या पत्रिकेत व उद्घाटन बोर्डावरही नाव नव्हते, यामुळे पालकमंत्री व गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. राज्य शासनाची ५० टक्के व केंद्राचा ५० टक्के असा निधी या पुलासाठी देण्यात आला आहे, तरीही कोणत्याही मंत्र्यांचे नाव नसल्याने प्रोटोकॉल पाळला गेला नाही, अशा शब्दात मंत्री पाटील व महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT