Gulabrao Patil
Gulabrao Patil esakal
जळगाव

Gulabrao Patil Statement : तर राऊत आडवा झाला असता...

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुसता दाढीवर हात फिरविला असता तर संजय राऊत खासदारकीच्या निवडणुकीत आडवा झाला असता अशा एकेरी शब्दात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे टीका केली. जळगाव येथे हिंदू जनसंघर्ष समितीतर्फे आयोजित आक्रोश मोर्चाप्रसंगी ते बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर खासदार संजय राऊत टीका करीत आहेत, मात्र त्यांना आमचे एकच आव्हान आहे, जर राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी नुसता दाढीवर हात फिरविला असता, तर संजय राऊत खासदार झाला नसता, आडवा पडला असता. आज खासदारही राहिला नसता. (Gulabrao Patil Taunting on Sanjay Raut Jalgaon News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

त्यामुळे त्यांनी उगाच टीका करू नये. ‘पालकमंत्री या नात्याने हिंदू जनजागृती समितीतर्फे मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी आलो आहे. अनेक पक्षांचे पदाधिकारी हिंदू ऐक्यासाठी एकत्र आले आहेत. जे मुस्लिम समाजबांधव आमच्यासोबत असतील, त्यांना आमचे सांगणे आहे. ‘इस देशमें रहेना होंगा तो वंदेमातरम’ करना होगा’.

आम्ही कोणत्या धर्माविषयी बोलत नाही. मात्र, आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले, तर आम्ही गांधीजी नाहीत, या गालात मारली तर दुसरा गाल पुढे करणार. आम्ही जशास तसे उत्तर देऊ हे लक्षात ठेवावे. जनतेच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो आहे. तीन पक्षाचे सरकार असते तर मी या व्यासपीठावर येऊच शकलो नसतो.

त्यावेळी या बाजूला कॉंग्रेस असती आणि एका बाजूला राष्ट्रवादी राहिली असती. आज एका बाजूला भाजप आहे, दुसऱ्या बाजूला सनातन आहे. हिंदू एकजुटीचे मी आभार मानतो. आमच्यावर मोठी टीका झाली. हिंदू समितीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे तिकडे बसले आहेत. सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवू, अशी ग्वाही देतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

SCROLL FOR NEXT