Harassment of married woman by police family jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime : पोलिस कुटुंबीयांकडून विवाहितेचा छळ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : प्रसूतीदरम्यान ब्रेन हँब्रेज होऊन विवाहिता जायबंदी झाली, तसेच मुलगी झाल्याने पोलिस पती व कुटुंबीयांकडून सतत त्रास दिला जात असल्याची तक्रार शाहिनबी ऐनोद्दीन यांनी दिल्यावरून जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. (Harassment of married woman by police family jalgaon crime news)

मलिकनगरमधील माहेरवाशीन शाहीनबी एनोद्दीन शेख (वय २६) यांचा विवाह पोलिस कर्मचारी ऐनोद्दीन निजामुद्दीन शेख यांच्यासोबत २०१९ मध्ये झाला. लग्नानंतर काही दिवस सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली.

शाहीनबी यांना मुलगी झाली. प्रसूतीदरम्यान त्यांना ब्रेन हँब्रेज होऊन त्या जायबंदी झाल्याने त्यांना नीट चालता येत नसल्याने पती ऐनोद्दीन, सासू सईदाबी, अश्रफ निजामुद्दीन यांनी टोमणे मारून भांडण उकरून काढून त्रास देण्यास सुरवात केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अलीमुद्दीन शेख, तबस्सूमबी शेख, रईसाबी जब्बार खान, नाजनीनबी शेख, अनिसाबी शेख शकील यांनी छळ करून गांजपाट केला. याबाबत पीडितेने तक्रार दिल्यावरून जिल्‍हापेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिस कर्मचारी नीलेश भावसार तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT