Harassment of married woman for 30 lakhs jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 30 लाखांसाठी विवाहितेचा छळ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : नोकरी करण्यासह माहेरहून नवीन घर खरेदीसाठी ३० लाख रुपयांची मागणी करत विवाहितेला बेदम मारहाण, दमदाटी करण्यात आली. (Harassment of married woman for 30 lakhs jalgaon crime news)

जोशी कॉलनीतील प्रियंका सचिन पानसरे (वय ३३) यांचा विवाह राहता येथील सचिन अरुण पानसरे यांच्याशी झाला आहे.

विवाहितेने नोकरी करावी, तसेच नवीन घर घेण्यासाठी माहेरहून ३० लाख रुपये आणावेत, अशी मागणी पतीने केली. विवाहितेने पैसे आणले नाहीत, म्हणून तिला वेळोवेळी बेदम मारहाण व शिवीगाळ केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दमदाटी करून छळ केला, तसेच सासू, सासरे आणि दीर यांनी पैशांसाठी विवाहितेला मानसिक त्रास दिला. त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या.

याबाबत प्रियंका पानसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती सचिन पानसरे, सासू सुमन पानसरे, सासरे अरुण पानसरे आणि दीर सागर पानसरे यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक सुनील सोनार तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Industrial Gas Connection: वाळूज उद्योगांना दिलासा! १० मोठ्या कंपन्यांना पाइप्ड गॅस जोडणी सुरू; गॅस टंचाईवर उपाय; वाळूजमधील उद्योगांकडे आता ‘PNG’चा पर्याय

Sambhajinagar Garbage Issue: कुठे ड्रेनेज फुटली, कुठे कचऱ्याचे ढीग; शहरातील नागरिक त्रस्त; घंटागाडी गायब, रस्त्यावर कचरा

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मार्च 2026

आजचे राशिभविष्य - 17 मार्च 2026

SCROLL FOR NEXT