crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 50 हजारांसाठी पत्नीचा छळ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : कानळदा (ता. जळगाव) येथील माहेरवाशीण विवाहितेला दुचाकी घेण्यासाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याचे समोर आले आहे.

मारझोड व त्रास असह्य झाल्याने पिडीतेने जळगाव तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. (Harassment of wife for 50 thousand jalgaon crime news)

पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानळदा येथील माहेर असलेल्या रत्नाबाई मुकेश कोळी (वय ३२) यांचा विवाह सुटकार(ता. चोपडा) येथील मुकेश कोळी यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला.

लग्नानंतर सुरवातीला सासरच्यांनी चांगले वागवले मात्र, त्यानंतर विवाहितेला माहेराहून दुचाकी घेण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही. विवाहितेला शिवीगाळ करत “पैसे आणले नाही तर तू कशी नांदते आम्ही बघतोच” अशी धमकी देत मारहाण केली.

या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानळदा येथील माहेर असलेल्या रत्नाबाई यांचा विवाह चोपडा तालुक्यातील सुटकार येथील मुकेश कोळी यांच्याशी झाला.

लग्नानंतर १५ दिवसांनी विवाहितेकडे पैशाची मागणी करीत तिचा छळ केला जाऊ लागला. वारंवार शिवीगाळ करीत मारहाण होत असल्याने विवाहिता माहेरी निघून आली. या प्रकरणी विवाहितेने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यावरून पती मुकेश कोळी, सासरे दगा कोळी, सासू चंद्रभागा कोळी, मावस सासरे जगन सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार अविनाश कांबळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Palkhi Accident : तापाच्या गोळ्या घेतल्या, चक्कर आली अन्... जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताचे धक्कादायक कारण समोर

'तिला मी आता कोणत्याच सिनेमात घेणार नाही' प्रवीण तरडे पत्नी स्नेहलबद्दल असं का म्हणाले... Viral Video

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Almatti Dam Update : 24 तासांत बदलली परिस्थिती! कोल्हापूर-सांगलीकरांना मोठा दिलासा; 'आलमट्टी'तून पाणी सोडणं पूर्णपणे बंद, कृष्णेची पातळी स्थिर राहणार?

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT