Harassment of woman by in laws for 10 lakhs jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime: 10 लाखांसाठी पत्नीचा सासरच्यांकडून छळ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील शिवाजीनगर दाळफळ परिसरातील माहेरवाशीण विवाहितेस माहेरून दहा लाख रुपये आणावे, यासाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून शिवीगाळ, मारहाण केल्याची घटना घडली. शनीपेठ पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Harassment of woman by in laws for 10 lakhs jalgaon crime news)

शिवाजीनगर दाळफळ परिसरातील माहेरवाशीण कोमल सूरज उपाध्याय (वय २८) यांचा आंध्र प्रदेशातील उस्मान गंज येथील रहिवासी सूरज राजाराम उपाध्याय यांच्याशी (वर्ष २०१९ मध्ये) रीतिरिवाजानुसार लग्न झाले होते.

सूरज याला दारू, गांजा पिण्याचे व्यसन आहे. वाईट व्यसनांना विवाहितेने विरोध केल्याने तिला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच व्यवसाय वाढविण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणावे, अशी मागणी करण्यात आली.

विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही म्हणून पती सूरज याच्यासह सासू आणि सासरे यांच्याकडून होणारा छळ सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आली.

शनीपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पती सूरज उपाध्याय, सासू प्रेमाबाई उपाध्याय, सासरे राजाराम उपाध्याय (सर्व रा. उस्मान गंज, आंध्र प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक प्रमोद पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! एकनाथ शिंदेंचे कौतुक, उद्धव ठाकरे गटाला धक्का; कारण सांगत ओमराजेंनी स्पष्ट केली भूमिका

Maharashtra Monsoon: मान्सून ज्याच्यामुळे रखडला ते सोमाली जेट आहे काय?

Groundwater Protection: पुणे जिल्ह्यात धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण व बेकायदेशीर बोअरवेलवर नियंत्रणाची मागणी; भूजल संवर्धनासाठी ठोस उपाययोजनांचा आग्रह

माढा कसबा पेठेतील ऐतिहासिक विठ्ठल Madha Vitthal Temple restoration: मंदिराला प्राचीन रूप परतवण्यासाठी सॅंड ब्लास्टिंगद्वारे रंग काढण्याचे काम; भाविकांसाठी दर्शन तात्पुरते बंद

Chikalthana All-Out Raid: चिकलठाणा ग्रामीण पोलिसांचा ‘ऑल आऊट’ सर्जिकल स्ट्राईक; वाळू-मुरूम माफिया, गुटखा तस्कर, जुगार व अवैध दारूवर धडक कारवाईत १.५९ कोटींचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT