jalgaon crime news sakal
जळगाव

जळगाव : आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यांचा छळ

पोलिस अधीक्षक कार्यालयात कारवाईसाठी निवेदन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बाभळेनाग (ता. पारोळा) येथे आंतरजातीय विवाह(Intercast marriage() केला म्हणून मुलगी तसेच मुलाच्या कुटुंबीयांना मुलींच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांकडून मारहाण करत छळ केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, दांपत्याने बुधवारी (ता. १२) जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे (jalgaon sp dr pravin mundhe)यांना निवेदन दिले असून, कारवाईची मागणी केली आहे.

मुलगा व मुलगी दोघेही सज्ञान आहेत. १५ ऑगस्टला दोघांनी आंतरजातीय विवाह(intercast marriage) केल्यानंतर पारोळा पोलिसांत ते हजर झाले. याठिकाणी पोलिसांनी मुलगा व मुलगी दोघांकडील आई-वडिलांना बोलाविले. मुलगी सज्ञान असल्याने तिने पतीसोबत राहण्याचे सांगितल्यावर कायदेशीररीत्या नोंदही करण्यात आली. मात्र आता मुलगी परत द्या म्हणत मुलीचे वडील तसेच नातेवाईक मुलाला तसेच त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करत छळ करत आहे. गावात राहायचे नाही म्हणत गाव सोडले नाही तर ठार करण्याची धमकीही मुलीच्या कुटुंबीयांकडून दिली जात आहे.

दोघांनी एकमेकांच्या संमतीने कायदेशीररीत्या विवाह केला असून, आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी या दांपत्याने केली आहे. याबाबत पारोळा पोलिसांत तक्रार दिल्यावर पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप तरुणाने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT