Corona Test esakal
जळगाव

कोरोना चाचण्या वाढविण्याचे आदेश : आरोग्य विभाग सतर्क

मुंबई, पुणे येथे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मुंबई, पुणे येथे कोरोनाबाधितांची (Corona) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. वरील शहरातून आपल्या गावात येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी कराच, सोबतच ज्यांना सर्दी, खोकला, ताप आला आहे, अशांचीही कोरोना चाचणी करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. दररोज कमीत कमी ५० कोरोनाच्या चाचण्या करण्याच्या सूचनाही आहेत. (Health department instructions to increase corona tests)

कोरोना महामारीने अनेकांची कुटुंबे उद्‌ध्वस्त केली आहेत. यामुळे कोरोनापासून दोन हात दूरच राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. कोरोनाबाधितांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे लसींचे दोन डोस घ्या, बुस्टर डोसही घ्या. यामुळे किमान इम्युनिटी वाढेल. मास्क नेहमी वापरा, वारंवार हात धुणे केव्हाही चांगले आहे. तिसरी लाट जशी आपण थोपविली तशी चौथी लाटही थोपवू. मात्र त्यासाठी स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. ताप, सर्दी, खोकला आला तर त्याच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करावी. जर रुग्ण पॉझिटिव्ह आला तर त्यावर लागलीच उपचार करता येतील.

भीती नको, सतर्कता बाळगा

नागरिकांना कोरोनाची भीती न बाळगता सतर्कता बाळगावी. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावा, हस्तांदोलन टाळा, गर्दीत जाणे टाळा. वारंवार हात धुवा, असे केल्याने कोरोनाचे विषाणू लांबच राहतील, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT