Flood water entering the house.  esakal
जळगाव

Jalgaon Rain Update : रावेर तालुक्यातील सर्वच मंडलात अतिवृष्टीची नोंद; हतनूरचे 4 दरवाजे उघडले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Rain Update : महिना उशिरा जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या पहिल्याच पावसाने बुधवारी रात्री रावेर तालुक्यात अक्षरश: हाहाःकार उडविला. रावेरमधील सर्वच मंडलांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला.

शासन दप्तरी प्रत्येक मंडलात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे तापी, पूर्णा नदीला आलेल्या पुराने हतनूर धरणातील पाणीसाठा वाढून धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. (Heavy rains were recorded in all mandals of Raver taluka jalgaon news)

जळगाव जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाचा पत्ता नव्हता. मॉन्सून राज्यात सक्रिय होऊनही जळगाव जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले नव्हते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले. मंगळवार व बुधवारी जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस झाला.

मात्र, बुधवारी रात्री व गुरुवारी पावसाने कहर केला. मध्य प्रदेश व विदर्भातील पावसामुळे तापी, पूर्णा नद्यांना पूर आला. त्यामुळे हतनूरचा पाणीसाठा वाढून या धरणाचे ४ दरवाजे प्रत्येकी अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. त्यातून ४ हजारांहून अधिक क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

रावेर तालुक्यात मुसळधार

रावेर तालुक्यात बुधवारी रात्री अचानक पावसाचा जोर वाढला. काही वेळातच ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना प्रचंड पूर आला. मूळ रावेर शहरात पाऊस कमी असला तरी सातपुड्यात प्रचंड पाऊस झाल्याने त्याचा परिणाम संपूर्ण तालुक्यावर झाला. रावेर तालुक्यातील सातही मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रावेरचा पाऊस असा (मि.मी.)

मंडल---- पाऊस

रावेर---- ११८.८

खिरोदा----९१.३

खानापूर----९०.५

सावदा-----९९.३

खिर्डी------७२

निंभोरा-----५३.५

ऐनपूर-----८५.२

जिल्ह्यातील पाऊस असा

जळगाव--- २६.४

भुसावळ----५.९

यावल-----४६.५

रावेर-----८५.२

चाळीसगाव---७.७

जामनेर---- २.२

पाचोरा ---२०.३

भडगाव--- १५.३

धरणगाव----१८.७

मुक्ताईनगर---२८.३

बोदवड-----२४.०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT