Swatch sundar bus station campaign
Swatch sundar bus station campaign sakal
जळगाव

Bus Stand Renovation : अमळनेर बसस्थानकाचा होणार कायापालट; स्वच्छ, सुंदर अभियानात सक्रिय सहभाग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील बसस्थानकाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला असून, त्या अंतर्गत आगारप्रमुखांच्या उपस्थितीत विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बुधवारी (ता. २४) बैठक पार पडली. (Hindu hrudaysamrat Balasaheb Thackeray Clean beautiful bus station Amalner bus stand will be transformed jalgaon news)

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे १ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धात्मक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.

बसस्थानकाच्या सुशोभीकरण तसेच स्वच्छतेबाबत शहरातील तरुण मंडळे, शाळा, महाविद्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, इतर सामाजिक संस्था तसेच लोकसहभागातून बसस्थानकाच्या नाविन्यपूर्णतेसाठी हे अभियान राबविण्यासाठी बसस्थानकांना प्रेरित करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर अमळनेर आगार प्रमुख आय. टी. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पालिकेतर्फे नियमित घंटागाडी, प्रसाधनगृसाठी लागणारे पाणी, शाळा व महाविद्यालयांतर्फे राबविण्यात येणारे श्रमदान, राजकीय पदाधिकाऱ्यांकडून देणगीच्या स्वरूपात प्रवाशांच्या सोयीसाठी लागणारे साहित्य याद्वारे अमळनेर बसस्थानक राज्यात आदर्श ठरावे, यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

या वेळी पालिकेचे आरोग्य विभागाचे हैबत पाटील, नितीन बिऱ्हाडे, साने गुरुजी विद्यामंदिराचे महेंद्र रत्नपारखी, प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. जयंत पटवर्धन तसेच इतर सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शहर व तालुक्यातील सामाजिक संस्था तसेच नागरिकांच्या बसस्थानकाच्या सुशोभिकरणासाठी काही नाविन्यपूर्ण कल्पना असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन आगारप्रमुख पठाण यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT