cosmetics esakal
जळगाव

Jalgaon News : बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील फुले मार्केटमधील (Market) व बळीराम पेठेतील दुकानात हिंदुस्तान युनिलिव्हरचे लॅक्मे कंपनीचे हुबेहूब लेबल व पॅकिंग करून बनावट मालाचा साठा करणाऱ्या

दुकानदाराविरुद्ध बुधवारी (ता. २२) दुपारी सव्वाचारच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Hindustan Unilever Lakme company fake goods are stocked with exact labels and packing in Phule Market Baliram Pethe shops jalgaon news)

सिंधी कॉलनीतील रहिवासी दुकानदार विपिन प्रताप वरयानी (वय ३३) यांची बळीराम पेठेतील साई प्लाझा व सेंट्रल फुले मार्केटमध्ये कॉस्मेटिकची दुकाने आहेत.

या दोन्ही दुकानात वेगवेगळ्या बनावट व हलक्या दर्जाचा लॅक्मे कंपनीचे हुबेहूब लेबल व पॅकिंग करून रिमूवर क्रीमचा साठा केला असल्याची माहिती कंपनीचे मुंबई येथील फिल्ड ऑफिसर सिद्धेश सुभाष शिर्के यांना मिळाली. त्यावरून त्यांनी बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास विपिन वरयानी यांच्या दोन्ही दुकानांमध्ये छापा टाकला.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्या ठिकाणी कंपनीच्या नावाने बनावट लेबल व पॅकिंग केलेला माल आढळून आला. याप्रकरणी सिद्धेश शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात कॉपीराईट ॲक्टनुसार दुकानदार विपिन वरयानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''संतोष देशमुख प्रकरणातल्या आरोपींनी राबवलं ऑपरेशन डी-टू'', उज्वल निकमांनी घेतलं थेट पाकिस्तानचं नाव

Trip Locations : गुगलवर वर्षभरात सर्च झालीत टॉप 5 ठिकाणे, दोन दिवसांची सुट्टी घेऊन प्लॅन करा ट्रीप, खर्चही एकदम कमी

Latest Marathi News Live Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग, सुदैवाने कुणालाही इजा नाही

ICC Rankings: वर्ल्ड कप स्टार दीप्ती शर्मा नंबर १! ऑस्ट्रेलियान खेळाडूला धक्का; पण, स्मृती मानधनाने गमावला ताज

नियती इतकी निर्दयी कशी? अपघात आई-वडिलांचं छत्र हरवलं, निरागस लेकरांनी एकमेकांना सावरलं; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT