quarantine esakal
जळगाव

जळगाव : विलगीकरणाचा कालावधी आता सात दिवसांवर

कोरोनाचा सुधारित ‘प्रोटोकॉल’; आठवड्यातच रुग्ण बरा

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाचा सुधारित ‘प्रोटोकॉल’; आठवड्यातच रुग्ण बरा

जळगाव : कोरोनाचा ओमिक्रॉन(omicron varient) हा नवा व्हेरिएंट देशात, राज्यात व पर्यायाने जिल्ह्यात तिसरी लाट(third wave of corona ) घेऊन आलाय.. परंतु, या नव्या व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेतील बाधितांचा संसर्ग वेग अधिक असला तरी लक्षणे सौम्य असून त्यादृष्टीने शासनाने बाधितांच्या विलगीकरणाचा कालावधी १४ दिवसांवरून ७ दिवसांचा केला आहे. त्यासंदर्भातील ‘प्रोटोकॉल’ जारी करण्यात आला आहे.मार्च २०२०पासून कोरोनाने देशभरात धुमाकूळ उडवून दिला. गेल्या दोन वर्षांत देशाने कडक लॉकडाऊनसह(strict lockdown) अनेक निर्बंधांना तोंड दिले. त्यामुळे संपूर्ण जनजीवन कोलमडून पडले. कोरोनाच्या दोन्ही लाटा ओसरताना हे निर्बंध शिथिल होऊन जनजीवन पूर्ववत झाले.(jalgaon corona update)

विलगीकरणाची शिक्षा

कोरोना या संसर्गजन्य व उपचार नसलेल्या रोगामुळे बाधिताना विलगीकरणाच्या(Quarantine) शिक्षेला सामोरे जावे लागले. पहिल्या लाटेत कोरोनाबद्दल प्रचंड भीती असल्याने बाधित रुग्णांनी २१ दिवसांच्या विलगीकरणाचा शासनाने ठरवून दिलेला ‘प्रोटोकॉल’ प्रामाणिकपणे पाळला.

विलगीकरणाचे दिवस कमी

दुसऱ्या लाटेत लक्षणे तीव्र व रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढले. मात्र, विलगीकरणाचा कालावधी २१ वरुन१४ दिवसांवर करण्यात आला. कोरोनाची दुसरी लाट आली तोवर उपचार पद्धती बऱ्यापैकी अवगत झाली असल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचवता आले. मात्र, त्यावेळच्या ‘डेल्टा’ व्हेरिएंटमुळे (delta varient)जीवितहानी मोठी होऊन अगदी तरुणांनाही जीव गमवावे लागले. या गंभीर स्वरूपात नागरिक मात्र १४ दिवसांचा विलगीकरणाचा प्रोटोकॉल पाळत नव्हते.

आता सात दिवसांवर

आता तिसरी लाट ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे(omicron varient) आल्याचे मानले जात आहे. मात्र, पहिल्या दोन्ही लाटांच्या तुलनेत संसर्गदर अधिक असूनही या लाटेतील आजार सौम्य स्वरुपाचा असल्याचे सध्यातरी दिसत आहे. बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असून ती लवकर बरीही होत आहेत. त्यामुळे सरकारनेच या वेळी विलगीकरणासाठी सात दिवसांचा कालावधी पुरेसा असल्याचे दिशानिर्देश दिले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण सात दिवसांच्या आतच बरेही होत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT