Dinesh Tawde's broken cupboards and safes, clothes and belongings thrown in disarray. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पाचोरा येथे भरवस्तीत घरफोडी; दागिने, रोकडसह 15 लाखांचा ऐवज लंपास

गजबलेल्या स्टेट बँक कॉलनीत घरफोडी होऊन सोन्याचे दागिने व रोकडसह १५ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील गजबलेल्या स्टेट बँक कॉलनीत घरफोडी होऊन सोन्याचे दागिने व रोकडसह १५ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना शुक्रवारी (ता. १९) रात्री घडली.

या धाडसी चोरीमुळे वसाहत भागातील रहिवाशांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. (house was burglarized and thieves looted gold ornaments and cash worth 15 lakhs jalgaon crime news)

स्टेट बँक कॉलनीत दिनेश तावडे यांचा प्लॉट क्रमांक १५ मध्ये बंगला आहे. तावडे कुटुंबीय पुढच्या खोलीत झोपलेले असताना चोरट्यांनी शुक्रवारी रात्री मागील भागातील खिडकीची लोखंडी जाळी अत्याधुनिक कटरने कापून घरात प्रवेश केला.

दोन्ही लोखंडी कपाट व लॉकर तोडून त्यातील २५ तोळे सोन्याचे दागिने व दिनेश तावडे यांच्या खिशातील सात हजार रुपये रोकड असलेले पाकीट व कागदपत्रे चोरट्यांनी लांबविली.

ज्या खोलीत कपाटे होती त्या खोलीच्या आतील कडी लावून चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. तावडे कुटुंबीय शनिवारी सकाळी उठल्यानंतर मुलांचे कपडे घेण्यासाठी ते मागील खोलीत गेले असता खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी मागे जाऊन बघितले असता खिडकीची लोखंडी जाळी कापल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन तावडे कुटुंबातील लहान मुलास तोडलेल्या लोखंडी जाळीच्या खिडकीतून आत सोडून आतून लावलेली कडी उघडून पाहणी केली.

तेव्हा चोरी झाल्याचे लक्षात आले. उपअधीक्षक धनंजय येरुळे यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

तावडे कुटुंबीय घरात झोपलेले असताना चोरट्यांनी सावधपणे धाडसी घरफोडी करून सुमारे १५ लाखांचा ऐवज लांबविल्याने वसाहत भागातील रहिवाशांमध्ये भीती पसरली असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी या निमित्ताने पुन्हा पुढे आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT