Chhatrapati Shivaji Brigade office bearers, Maratha community members sitting on hunger strike outside the collector office. esakal
जळगाव

Jalgaon Protest : बकालेच्या अटकेसाठी आता जंतर-मंतरवर करणार उपोषण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Protest : समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करून तत्कालीन एलसीबीचे निरिक्षक किरण बकाले याला फरार होऊन एक वर्ष झाले तरी त्यांना अटक न केल्याने आज जळगावात मराठा सन्मान यात्रेच्या अंतर्गत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. (hunger strike will now be held at Jantar Mantar for arrest of Bakale jalgaon news)

यात बकालेच्या अटकेच्या मागणीसाठी आता थेट दिल्लीत जंतर-मंतरवर २ ऑक्टोबर रोजी उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तत्कालीन एलसीबीचे निरिक्षक किरण बकाले यांनी महिलांविषयी केलेले वक्तव्य हे समाजमाध्यमांमधून व्हायरल झाल्यामुळे राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली होती.

यामुळे मराठा समाजातून तीव्र प्रक्षोभ उसळला होता. बकाले याला निलंबित करण्यात आल्यानंतर तो फरार झाला होता.

या घटनेला एक वर्ष झाले. अनेकदा आंदोलने करून देखील काहीही उपयोग झाला नाही.

मुख्यमंत्र्यांनी देखील बकालेस तत्काळ अटक करण्याचे निर्देश देऊन देखील कारवाई झालेली नाही. या घटनेचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आत्मसन्मान मोहिमेच्या अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT