Jalgaon crime news esakal
जळगाव

संतापाच्या भरात पत्नीवर प्राणघातक हल्ला; पतीसह दोघांविरुद्ध गुन्हा

प्रेमप्रकरणातून लग्न झालेल्या जोडप्यात हे भांडण झाले.

सकाळ वृत्तसेवा

यावल (जि. जळगाव) : प्रेमप्रकरणातून लग्न झालेल्या जोडप्यात भांडण झाले. नंतर पतीने रागाच्या भरात मित्राला सोबत घेऊन माहेरी असलेल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना अट्रावल (ता. यावल) येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. पतीसह त्याच्या मित्राने सासू व शालकासही मारहाण केली. याबाबत येथील पोलिसांत पतीसह त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अट्रावल (ता. यावल) येथील अर्जुन सुरेश भिल यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी योगिता हिने दोन वर्षांपूर्वी खुशाल ऊर्फ बंटी गजानन बोरसे (रा. भुसावळ) याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. प्रेम विवाहानंतर दांपत्यास मुलगी झाली. योगिता प्रसूती व भावाचे लग्न असल्याने गेल्या आठ महिन्यांपासून अट्रावल येथे माहेरी होती. ३ जूनला तिच्या भावाचे लग्न होते. या लग्नामध्ये जावई विशाल ऊर्फ बंटी गजानन बोरसे हा आला होता. लग्न समारंभामध्ये दांपत्याचे भांडण झाले. खुशाल बोरसे पत्नी व मुलगीला सोडून संतापात भुसावळला निघून आला. त्यानंतर त्याने योगिता हीस भ्रमणध्वनीवरून अनेक वेळा शिवीगाळ केली. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्रीनंतर खुशाल ऊर्फ बंटी गजानन बोरसे हा आणि त्याचा मित्र अरविंद कांबळे अट्रावल गावात आले व मध्यरात्रीनंतर अर्जुन भिल यांच्या घरात प्रवेश करून लहान बालिकेसोबत झोपलेल्या पत्नी योगिता बोरसे हिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात योगिता हिच्या डोळ्याजवळ आणि नाकाच्या खाली गंभीर दुखापत झाली आहे.

हा प्रकार योगिताची आई अंजुबाईच्या लक्षात आल्यावर त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. यामुळे शालक झोपेतून जागी झाले. त्यांनाही या दोघांनी मारहाण केली आणि तिथून पळ काढला. जखमी अवस्थेतील अंजूबाई आणि योगिता यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचार करून योगिता हिस तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले आहे. याप्रकरणी खुशाल ऊर्फ बंटी गजानन बोरसे व त्याचा मित्र अरविंद कांबळे (दोघे रा. भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रभारी पोलिस निरीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद खांडबहाले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Fire Incident Video : निवडणुकीच्या विजय जल्लोषादरम्यान मोठी आग; दोन नवनिर्वाचित नगरसेवक भाजले, अनेक लोक जखमी, जेजूरीतील धक्कादायक Video समोर...

Muncher Municipal Result:'मंचर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या राजश्री गांजाळे'; आमदार शरद सोनवणेंनी फुगडीतून व्यक्त केला आनंद..

राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष! एम.कॉम.चे शिक्षण घेणारी २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे मोहोळच्या नगराध्यक्षा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा

Marathwada Sahitya Sammelan: ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी फ. म. शहाजिंदे; बीड जिल्ह्यात हाेणार संमेलन!

Nagaradhyaksha Election Poll Results : नगराध्यपदाच्या निकालानंतर अजित पवार गटाच्या नेत्याने टोचले स्वत:च्या पक्षाचे कान; म्हणाले, आत्मचिंतनाची गरज!

SCROLL FOR NEXT