Cooking machine esakal
जळगाव

Jalgaon News : बेकायदेशीर रंधा मशिन सुरूच; वन विभाग, प्रदूषण नियत्रंण मंडळाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ध्वनिप्रदूषण करण्यासह लाकूड कटाईसाठी रंधा मशिन वापरणे बेकायदेशीर आहे. मात्र जळगावातील लाकूड वखारींमध्ये या मशिनचा सर्रास वापर होत आहे. त्याकडे वनाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.

शिवाजीनगर भागातील सॉमिलमध्येही त्याचा वापर होत आहे. या मशिनमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत आहे.

वखारीतील कामगारांना ध्वनिप्रदूषणामुळे त्रास होत आहे. आता वखारी रहिवासी भागात आल्याने नागरिकांनाही ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत आहे. (Illegal cooking machine continue Neglect of Forest Department Pollution Control Board Jalgaon News)

याबाबत अधिक माहिती घेतली असता, लाकूड कटाई वखारीत केवळ मर्यादित मशिनींचा वापर करण्याचे आदेश आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील बहुतांश लाकूड कटाई वखारींमध्ये दोन ते तीन मशिनींचा सर्रास वापर होत आहे.

मध्यंतरी वन विभागाने छापे टाकून वखारींवर कारवाई केली होती. आता पुन्हा या मशिनींचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे बंदी असतानाही लाकूड कटाई वेगाने केली जात आहे.

लाकूड वखारीत मर्यादित मशिनचा वापर करून लाकूड कटाई रोखून निसर्गाचे संरक्षण करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे, तसेच मशिनीच्या माध्यमातून होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्याची जबाबदारी ध्वनिप्रदूषण नियंत्रण विभागाची अर्थात प्रदूषण महामंडळाची आहे.

मात्र हे दोन्ही विभाग दुर्लक्ष करीत आहेत. या विभागांच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रंधा मशिनींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

SCROLL FOR NEXT