Crime News
Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मुक्ताईनगरात लाखोंचा अवैध पानमसाला पकडला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : बऱ्हाणपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे साडेतेरा लाखांचा अवैध सुगंधित पानमसाला घेऊन जाणाऱ्या महिंद्रा बोरोलो पिकअप वाहनावर अन्न व औषध प्रशासनाने रविवारी (ता. २८) पहाटे सहाला कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

अवैध पानमसालाप्रकरणी कारवाईचे सत्र सुरुच असून, महिनाभरातील ही चौथी कारवाई आहे. (Illegal pan masala worth lakhs caught in Muktainagar jalgaon crime news)

बऱ्हाणपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे अवैधरीत्या पानमसाला घेऊन जाणाऱ्या वाहनाविषयी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अन्न व औषध प्रशासन अधिकारी रामचंद्र भरकड यांनी सहकाऱ्यांसह मुक्ताईनगर परिसरात ठिकठिकाणी शिताफीने सापळा रचला.

दरम्यान, रविवारी (ता. २८) पहाटे सहाच्या सुमारास मुक्ताईनगर - मलकापूर महामार्गावरील पिंप्री आकाराऊतजवळील हॉटेल ओम साईजवळ महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच २०, जीसी २९६७) थांबवून वाहनाची तपासणी केली असता त्यात प्रिमियम राजनिवास सुगंधित पानमसाला व जाफरानी जर्दा असा एकूण १३ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा माल व वाहन (अंदाजित किंमत ४ लाख ५० हजार) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संशयित वाहनचालक सचिन भीमराव कोलते (वय ३३), क्लिनर सुभाष रंगनाथ कनसे (वय ४५, दोघे रा. दीपक लॉनसमोर, हर्सूल सावंगी, छत्रपती संभाजीनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पानमसाला अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेत वाहन व दोघा संशयिताना मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात असून, सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप शेवाळे तपास करीत आहेत. दरम्यान, महिनाभरातील ही चौथी कारवाई असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT