Tree Cutting esakal
जळगाव

Jalgaon News : तोंडापूर परिसरात वृक्षांची अवैध कत्तल! खानदेश मराठवाडा सीमेवर जंगल दुर्लक्षित

वनविभागाने वेळीच लक्ष न घातल्यास या भागातील जंगल बोडके होण्याची भीती निसर्ग प्रेमी व पर्यावरण प्रेमी कडून व्यक्त होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

तोंडापूर (ता जामनेर) : तोंडापूर परिसराला लागून अजिंठा पर्वत रांगा असून या भागात वृक्षांची अवैध कत्तल सुरु आहे.

वनविभागाने वेळीच लक्ष न घातल्यास या भागातील जंगल बोडके होण्याची भीती निसर्ग प्रेमी व पर्यावरण प्रेमी कडून व्यक्त होत आहे. ( Illegal slaughter of trees in tondapur area Forest neglected on Khandesh Marathwada border Jalgaon Crime)

तोंडापूर हे मराठवाडा व खानदेश च्या सीमेवर असून जळगाव जिल्ह्यातील शेवटचे गाव आहे या परिसराला जवळ अजिंठा पर्वतरांग आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वृक्ष तोड होत असून दररोज दिवसा लाकडाने भरलेले ट्रॅक्टर भरून जातांना पहायला मिळतात.

त्यामुळे याकडे वन विभागाने वेळीस लक्ष न दिल्यास जंगल बोडका होण्याची भीती निसर्ग प्रेमी व पर्यावरण प्रेमी वर्गातून व्यक्त होत आहे.

तोंडापूर परिसराला मराठवाडा व विदर्भ च्या सीमेवर असल्याने विदर्भातील काही भागात व मराठवाडा भागातील गावात वन विभागाचे कर्मचारी पोहचत नसल्याने त्या भागातून तोंडापूर गावातील बसस्थानकावरून रविवार सुट्टीचा दिवस व रात्रीच्या वेळी लाकूडतोड व्यापारी लाकडाचे वाहन भरून वाहतूक करत आहे.

पासचा गैरवापर

असलेली लाकडाचा वापर वीट भट्ट्या वर सर्रासपणे करण्यात येत आहे. वन विभागाकडून वाहतूक परवाना न घेता वीट भट्ट्या मालकाच्या नावावर असलेल्या पासेस चा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आहेत.

कागदोपत्री पास फक्त नावाला असून त्यावरील परवानगीपेक्षा जास्त वृक्षांची कत्तल करून लाकडाची वाहतूक होत असल्याने जंगल बोडके होऊन अजिंठा डोंगररांग मधील वन्यप्राणी बिबट्याचा वावर गाव शिवारात होत आहे.

गावाच्या लगत असलेल्या केळीच्या बागेत दिवसा बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे. तोंडापूर परिसरात होणाऱ्या अवैध वृक्ष तोडीमुळे जंगलातील पशूचा लोकवस्तीच्या दिशेने राबता वाढायला लागला आहे.

त्यामुळे अवैध कत्तलीला प्रतिबंध न बसल्यास दिवसा वन्यप्राण्याचा लोकवस्तीत उच्छाद वाढण्याची ग्रामस्थांची भीती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT