In Bhadgaon work of farm road construction are stopped jalgaon news esakal
जळगाव

Road Construction : सरकारी काम अन् बारा महिने थांब! भडगाव तालुक्यात शेतरस्त्यांची कामे रखडली

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मोठा गाजावाजा करत शासनाने प्रत्येक गावात शेतरस्ते मंजूर केले. मात्र पावसाळा तोंडावर आला तरी शासकीय यंत्रणेच्या वेळकाढू धोरणामुळे रस्त्यांची कामे रखडल्याचे चित्र आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. तर या निर्ढावलेल्या यंत्रणेकडे आमदार किशोर पाटील लक्ष देतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(In Bhadgaon work of farm road construction are stopped jalgaon news)

राज्य शासनाने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चांगले रस्ते व्हावेत, या उद्देशाने मातोश्री शेत पाणंद रस्त्याच्या कामाना मंजुरी दिली. भडगाव तालुक्यात तब्बल ४७ रस्त्यांच्या कामाना मंजुरी दिली. मात्र प्रत्यक्षात कामे सुरू व्हायचे नाव घेत नाहीये. काही रस्त्यांच्या कामाना मंजुरी मिळून वर्ष होत आले तरी कामे सुरू झालेली नाहीत.

प्रशासनाचा वेळकाढूपणा

आमदार किशोर पाटील यांनी राज्य शासनाकडून पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात शेत रस्त्यांची कामे मंजुरी मिळवली. मात्र प्रत्यक्षात प्रशासकीय यंत्रणेच्या ढिम्म आणि वेळकाढू धोरणामुळे कामे रेंगाळल्याचे चित्र आहे. आमदार किशोर पाटील यांनी कामांबाबत अनेक बैठकाही घेतल्या.

मात्र प्रशासकीय यंत्रणेने वेळ मारण्यापलिकडे काहीही केले नाही. भडगाव तालुक्यात ४७ कामे मंजूर आहेत. त्यापैकी १८ कामे ही २४ लाखाच्या वर असल्याने त्यांना मंजुरीसाठी मुंबईला पाठविण्यात आले आहेत. तर उर्वरित कामांपैकी ६ कामांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. मात्र तेही प्रत्यक्षात सुरू नाहीत. कधी संपाचे नाव सांगितले जाते तर कधी तांत्रिक अडचण पुढे करून चलढकल केली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आता पावसाळ्याचा अडसर

आता 'मे'चा शेवटचा आठवडा सुरू आहे. त्यामुळे जूनमध्ये पावसाळा सुरू होईल. पर्यायाने कामे बंद असतात. त्यामुळे यंदाही शेत रस्त्यांची कामे रखडल्याचे चित्र आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शोषखड्डे, विहीर पुर्नभरण आदी कामांना प्राधान्य द्यायला सांगितले आहे, असे सांगत यंत्रणेने रस्त्यांच्या फायली बांधून ठेवून दिल्या आहेत.

त्यापूर्वी राज्यभरात रोजगार हमी योजनेच्या कामावर गटविकास अधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे सर्व कामे ठप्प झाली होती. त्यामुळे यंदाही शेतरस्त्यांच्या कामांना ब्रेक लागला आहे.

सरकारी काम अन् बारा महिने थांब

ज्या गावांना रस्ते मंजूर झाले आहेत, तेथील शेतकरी रस्ते होतील म्हणून सुखावले. आमदार किशोर पाटील यांनी गाव भेटी दौऱ्यात पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे कामे होतील, असे आश्वासन गावकऱ्यांना दिले. मात्र प्रत्यक्षात प्रशासकीय यंत्रणेच्या वेळकाढू धोरणामुळे कामे होऊ शकली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या 'सरकारी काम अन् बारा महिने थांब' असेच काहीसे अनुभवयाला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: 'आमदार आले की उभं राहा'! महाराष्ट्र सरकारचा अधिकाऱ्यांना अजब आदेश; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : सपा नेते अबू आझमी यांचे गोवंडी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर आंदोलन

Sharad Pawar: राज ठाकरेंसाठी शरद पवार आग्रही; काँगेसलाही दिला मेसेज, उद्धव ठाकरेंची भूमिका काय?

Pay and Park Issue : इस्कॉन मंदिराजवळील ‘पे अँड पार्क’मध्ये वाहनचालकांची लूट; महापालिकेच्या भक्तिवेदांत पार्किंगमधील प्रकार

Horoscope Prediction 2025: उद्या तयार होतोय केंद्र त्रिकोण योग, शनिदेवाच्या आशीर्वादाने मेष अन् मिथुनसह 'या' 5 राशींचे उजळेल भाग्य

SCROLL FOR NEXT