Beating News esakal
जळगाव

Jalgaon Crime Update : जिल्हा रुग्णालयात तिघांमध्ये हाणामारी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा नातलग व सफाई कर्मचारी यांच्यात वाद होऊन जोरदार हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १८) सकाळी घडली. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. जिल्हा शासकीय महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने सफाई कर्मचारी काम करतात.

शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास महाविद्यालयातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये कंत्राटी कर्मचारी आयुष खराटे आणि पवन सारवन (दोघे रा. गुरूनानकनगर, शनिपेठ) काम करीत होते. (In district hospital beating between Three Jalgaon Crime News)

त्याचवेळी आश्विन कमलाकर बिऱ्हाडे (वय २४ रा. जैनाबाद, जळगाव) हा तरुण त्यांचे नातवाइकास जिल्हा शासकीय रुग्णालयात भेटण्यासाठी आला होता.

स्वच्छता केलेल्या रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून अश्‍विन व कंत्राटी कर्मचारी आयुष खराटे, पवन सारवन यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन त्यांच्यात जोरदार धुमश्‍चक्री उडाली. याबाबत अश्‍विनने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT