Corona Patients
Corona Patients Sakal
जळगाव

जळगाव जिल्ह्यात २६६ बाधित; सक्रिय रुग्ण दिड हजांरावर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा(jalgaon corona update) आलेख वाढता असताना गुरुवारपर्यंत लक्षणे असलेल्या रुग्णसंख्येचा आकडा स्थिर होता. शुक्रवारी मात्र नव्या २६६ रुग्णांची नोंद होऊन सक्रिय रुग्णसंख्या पंधराशेवर पोचली. तर लक्षणे असलेले असलेले रुग्णही जवळपास दुपटीने वाढलेत.जळगाव जिल्ह्यात या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या १४ दिवसांत जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दहावरुन पंधराशेवर गेली आहे. (increase corona patients in jalgaon district)

गुरुवारपर्यंत (ता.१३) सक्रिय रुग्णांपैकी केवळ २४ रुग्णांमध्येच लक्षणे दिसून येत होती. शुक्रवारी मात्र, नव्या २६६ रुग्णांची नोंद होऊन सक्रिय रुग्णसंख्या १५१५ झाली आहे. पैकी ४७ रुग्णांमध्ये लक्षणे असून उर्वरित १४६८ रुग्ण लक्षणे विरहित आहेत. तर केवळ ७ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. दिवसभरात ३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले, हीदेखील दिलासादायक बाब म्हणावी लागेल. शुक्रवारी १५९४ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. जिल्ह्यात नव्याने आढळून येत असलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरासह भुसावळ पुढेच आहे. जळगाव शहरात शुक्रवारी नव्या १११ रुग्णांची नोंद होऊन १७ रुग्ण बरे झाले. शहरात सध्या ४०२ सक्रिय रुग्ण आहेत. तर भुसावळला ७१ नवे बाधित आढळून आले असून ९ जण कोरोनामुक्त झाले. भुसावळ तालुक्यात आता सक्रिय रुग्ण ६३३ आहेत.

अन्य ठिकाणचे नवे रुग्ण असे :

  1. जळगाव ग्रामीण

  2. अमळनेर ६

  3. चोपडा ३५

  4. पाचोरा २

  5. धरणगाव १

  6. यावल ३

  7. एरंडोल व जामनेर प्रत्येकी १

  8. रावेर व पारोळा प्रत्येकी २

  9. चाळीसगाव २७

  10. भडगाव, बोदवड व मुक्ताईनगरात शुक्रवारी एकही रुग्ण आढळून आला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT